• Download App
    Sharad Pawar संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    Sharad Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : operation sindoor च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये चर्चा केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोनदा पत्र लिहून केली. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वेगळ्या पद्धतीने त्या मागणीत खोडा घातला. संरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर गंभीर चर्चा होणे अपेक्षित आहे. ती संसदेच्या विशेष अधिवेशनात करण्यापेक्षा सर्वपक्षीय बैठकीत चांगली होऊ शकते, असे पवार म्हणाले.

    राहुल गांधींसकट काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी लावून धरली. त्यामध्ये सचिन पायलट, कपिल सिब्बल, भूपेश बघेल यांचा समावेश राहिला. अखिलेश यादव यांनी देखील ही मागणी उचलून धरली.



    पण या संदर्भात शरद पवारांनी मात्र वेगळे मत व्यक्त केले. संरक्षण हा अतिशय गंभीर आणि देशाच्या दृष्टीने संवेदनशील विषय आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने काही माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक असते. सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायचे ठरवले, तर त्याला आमचा विरोध नाही, पण संरक्षणासारख्या गंभीर विषयात संसदेच्या विशेष अधिवेशनात तेवढीच गंभीर चर्चा होईल, की पंतप्रधान संरक्षण मंत्री यांनी देशातल्या सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना एकत्र बोलवून गंभीर चर्चा होईल, याचा विचार केला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसने केलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीला छेद गेला.

    Sharad Pawar rejects Congress’ demand for a special session of Parliament!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mahayuti BMC : महापालिकेसाठी महायुतीचा वचननामा- मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार:बेस्ट बसच्या तिकीटात महिलांना 50 टक्के सूट

    Prakash Mahajan : तुमच्या डोक्यावर कोणी नाही म्हणून बेलगाम; राज ठाकरेंच्या आरोपांवर प्रकाश महाजनांचा घणाघात; उद्धव ठाकरेंवरही निशाणा

    BMC Election 2026 : निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या 4,521 कर्मचाऱ्यांवर आजपासून पोलिस कारवाई, एकूण 6 हजार 871 अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटिसा