विशेष प्रतिनिधी
पुणे :Sharad Pawar सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जो निर्णय घेण्यात आला तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे. त्यावर मी काही भाष्य करणार नाही, असे खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे.Sharad Pawar
शरद पवार म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल इतकी घाई मी केलेली नाही. सुनेत्रा पवारांशी माझी काहीही चर्चा झालेली नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये विलीनीकरणाबद्दल चर्चा झाली होती. याबद्दल संपूर्ण जबाबदारी अजित पवारांकडे होती. पण या सर्व गोष्टीमध्ये आता खंड पडला आहे. अजित पवार यांच्या एकत्रीकरणाची इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे.Sharad Pawar
अजित पवारांची इच्छा पूर्ण व्हावी
शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या एकत्रीकरणाची इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे. गेल्या 4 महिन्यापासून ही चर्चा सुरू होती, आता कोण चर्चा करणार हे ठरेल. दोन्ही पक्षामध्ये संवाद रहावा यासाठी आम्ही सकारात्मक होतो. विलीनीकरणाबद्दल निर्णय 12 तारखेला जाहीर करणार होते, त्या चर्चेत मी नव्हतो पण जयंत पाटील आणि अजित पवारांचे बोलणं झाले होते.
अजित पवारांच्या जाण्याने मोठा धक्का
शरद पवार म्हणाले की, पवार कुटुंबातील सर्वांना अजित पवारांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. राज्याच्या दृष्टीने जे जे करणे गरजेचे आहे ते सर्व काही आम्ही करु. आमच्या नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याचे काम करू. सुनेत्रा पवारांचा शपथविधी आहे का नाही याबद्दलच मला माहिती नाही. त्यामुळे मी उपस्थित राहणार का नाही हा प्रश्नच येत नाही. नरेश अरोरा कोण आहेत मला माहिती नाही.
जयंत पाटील चर्चा करतील
शरद पवार म्हणाले की, दोन्ही पक्ष एकत्र येतील का नाही याबद्दल आताच काही सांगता येत नाही. पण अजित पवारांची दोन्ही पक्ष एकत्र यावे ही इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे. अपघात हा अपघात त्यावर काय बोलणार. दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत अजित पवार – जयंत पाटील हे चर्चा करत होते आता जयंत पाटील आणि ही मंडळी पुढे काय करायचे हे ठरवतील. आम्ही भाजपसोबत जाण्याचा काय संबंध आहे. आमची चर्चा ही पक्षासंदर्भात सुरू होती.
Sharad Pawar on Sunetra Pawar’s Swearing-in: ‘It’s Their Internal Decision’
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या ऐक्याचे त्रांगडे, मुख्य नेतृत्वाचा पेच; दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची खेचाखेच; पवारांच्या एकछत्री अंमलाला सुरुंग!!
- India-EU FTA : केंद्राने EUच्या सफरचंदांवर आयात शुल्क कमी केले; 50 ऐवजी 20% केले, हिमाचल सफरचंद उद्योगावर संकट
- Supreme Court : SIR वर सुनावणी- सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला; याचिकाकर्ते म्हणाले- ECI मनमानी करू शकत नाही
- देवेंद्र फडणवीसांशी आज झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवारांचे नावच नव्हते, पण…; प्रफुल्ल पटेलांची माहिती; Between the Lines काय??