विशेष प्रतिनिधी
मुंबई : खुंटा हलवून केला बळकट, डोळ्यातून काढले पाणी; कोणालाही केले अध्यक्ष तरी आमदारांची गाठणार का शंभरी??, हा “मिलियन डॉलर क्वेश्चन” आहे!! शरद पवारांच्या आजच्या कथित “अचानक” राजकीय खेळीतून तो उद्भवला आहे. Sharad Pawar quit as NCP president, will new president be able to bring 100 MLAs of NCP
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्ती जाहीर करून महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडून दिली आहे. त्यातून अजित पवारांच्या बंडाच्या बातम्या हवेत विरल्या आहेत. ते फक्त यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये कसे दरडावत होते, एवढ्याच बातम्या उरल्या आहेत आणि स्वतः शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुन्हा केंद्रस्थानी आले आहेत. साताऱ्यातल्या पावसासारखेच हे काहीसे झाले आहे!!
पण शरद पवारांनी कितीही खुंटा हलवून केला बळकट, डोळ्यातून काढले इतरांच्या पाणी तरी राष्ट्रवादी काँग्रेस गाठणार का आमदारांची शंभरी??, हा मिलियन डॉलर क्वेश्चन मात्र त्यांच्या निवृत्तीनंतरही अनुत्तरीत राहणार आहे. निदान 2024 च्या निवडणुकीपर्यंत तरी या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही किंबहुना खुद्द शरद पवारांच्या राजकीय बहराच्या काळात जे राष्ट्रवादी काँग्रेसला कधी जमले नाही, आमदारांची 75 कधी काढता आली नाही, ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पितृ मार्गदर्शनाखाली नव्या अध्यक्ष किंवा कार्याध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आमदारांची शंभरी आणि खासदारांचे डबल डिजिट गाठणार का??, हा खरं म्हणजे फार महत्त्वाचा प्रश्न आहे.
- Sharad Pawar : शरद पवार यांना कोरोनाची लागण, देशभरातील दिग्गज नेत्यांकडून लवकर बरे होण्याची सदिच्छा!
राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटा असलेली महाविकास आघाडीची सत्ता जाऊन आता 9 महिने उलटले आहेत. शरद पवारांची महाविकास आघाडीची खेळी देखील संपुष्टात आली आहे. अशावेळी त्यांनी निवृत्तीची घोषणा करून “मास्टर स्ट्रोक” मारल्याचा मराठी माध्यमांचा नेहमीचा “चाणक्यी% दावा आहे, पण असे कितीही दावे केले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशावर मात्र पवारांच्या पूर्व आणि उत्तर कारकीर्द लागलेले प्रश्नचिन्ह कायम आहे.
शरद पवार हे 60 किलोमीटर रेंज असणारे राजकीय मिसाईल आहे, असे 1990 च्या दशकात महाराष्ट्र विधिमंडळाच्या वर्तुळात बोलले जायचे. म्हणजे शरद पवार कोणत्याही पक्षात असल्या अथवा नसले तरी ते स्वतःच्या बळावर 60 च्या आसपास आमदार निवडून आणू शकतात, अशी ती चर्चा होती. ती चर्चा 90 चे दशक ओलांडून आता 30 वर्षे उलटून गेली तरी आजही कायम आहे. पवार आजही 60 किलोमीटर गाठणारेच मिसाईल आहे!! किंबहुना 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत तर पवार नावाचे राजकीय मिसाईल 60 किलोमीटरची रेंजही गाठू शकले नाही, ते फार अलीकडेच पडले.
त्यामुळे त्यांच्या इतकाही राजकीय करिष्मा नसलेला कोणताही नेता मग भले तो अजितदादांच्या गटातला का असेना किंवा पवारांच्या मनातला का असेना किंवा अगदी प्रतिभाताईंच्या किचन कॅबिनेट मधला का असेना, अध्यक्ष अथवा कार्याध्यक्ष झाला तरी त्याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कात टाकून टाकून तरी किती टाकणार?? आणि आपल्या यशाचे प्रमाण किती वाढवून वाढवून वाढवणार?? हा “मिलियन डॉलर क्वेश्चन” आहे. मराठी माध्यमे हा प्रश्न विचारत नाहीत. ते त्यांचे “पॉलिटिकल कंपल्शन” आहे. पण म्हणून महाराष्ट्रातली राजकीय वस्तुस्थिती बदलत नाही आणि खुंटा हलवून केला बळकट, डोळ्यातून काढले पाणी; कोणीही केला अध्यक्ष तरी आमदारांची गाठणार का शंभरी??, या “मिलियन डॉलर क्वेश्चनचे” महत्व कायम राहणार आहे!!
Sharad Pawar quit as NCP president, will new president be able to bring 100 MLAs of NCP
महत्वाच्या बातम्या
- Gangster Act Case : बहुजन समाज पार्टीचे खासदार अफजल अन्सारींचे लोकसभा सदस्यत्व रद्द!
- ठाकरे विरुद्ध शिंदे – फडणवीस सरकारच्या संघर्षाचा पुढचा अंक 6 मे रोजी बारसू मध्ये!!; पवारांची भूमिका सावध आणि संशयाची
- बारसू प्रकल्पासाठी आता शरद पवारांना का भेटता?, उद्धव ठाकरेंनी दाबली शिंदे – फडणवीस सरकारची नस
- मुंबईच्या वज्रमूठ सभेत ठाकरे – अजितदादा – अशोक चव्हाण यांच्या भाषणातून मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेचा विषय गायब