• Download App
    खुंटा हलवून केला बळकट, डोळ्यातून काढले पाणी; निवृत्तीचा निर्णय ढळला??, पण खुर्चीवर बसे ना कोणी!!|Sharad Pawar quit as NCP president, but may rethink his own decision in a day or two

    खुंटा हलवून केला बळकट, डोळ्यातून काढले पाणी; निवृत्तीचा निर्णय ढळला??, पण खुर्चीवर बसे ना कोणी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कृत निवृत्ती नाट्याचा पुढचा अंक सुरू झाला आहे.Sharad Pawar quit as NCP president, but may rethink his own decision in a day or two

    खुंटा हलवून केला बळकट
    डोळ्यातून काढले पाणी
    निवृत्तीचा निर्णय ढळला??
    पण खुर्चीवर बसे ना कोणी!!

    असे या अंकाचे नाव आहे.



    शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचे जाहीर केल्यानंतर आज दिवसभर ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या, महाराष्ट्रात जो भावूतेचा पूर आला, त्यानंतर पवारांनी आपल्या निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचा निरोप अजित पवारांमार्फत यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पाठविला. तेथे अजित पवारांनी सुप्रिया सुळे आणि बाकीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांना पवारांचा निर्णय कळविला. शरद पवारांनी कार्यकर्ते एक हट्टी असतील, तर मी डबल हट्टी आहे. त्यामुळे त्यांनी रास्ता रोको उपोषण असले, कोणतेही प्रकार करू नयेत. पक्षाच्या वेगवेगळ्या पदांचे राजीनामे देऊ नयेत. ते मी स्वीकारणार नाही. मला माझ्या निर्णयाचा फेरविचार करण्यासंदर्भात 2 – 3 दिवस हवे आहेत आणि त्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करेन, असे शरद पवारांनी अजित पवारांमार्फत कार्यकर्त्यांना सांगितले. स्वतः अजित पवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर छगन भुजबळ यांच्या साथीने पत्रकारांना ही माहिती दिली.

    त्याचवेळी शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवाराचा अंतर्गत मामला आहे. त्यासाठी कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अथवा नेत्यांनी कुठलेही आंदोलन करून सर्वसामान्य जनतेला आणि नागरिकांना भेटीला धरू नये. पवार साहेबांना ते आवडणार नाही आणि तसले प्रकार ते सहन करणार नाहीत, असा इशारा दिला.

    आज दिवसभर पवारांना देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमधून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे तसेच राष्ट्रवादी सोडून अन्य पक्षाच्या नेत्यांचे फोन येत होते. या सर्व फोनला पवारांनी उत्तरे दिली. अनेकांना त्यांनी सायंकाळी 7.30 नंतर फोन करायला सांगितले.

    दरम्यानच्या काळात आपल्याला निर्णयासंदर्भात फेरविचार करण्यासाठी 2 – 3 दिवस हवे आहेत, असे सांगून पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना वेगळी हिंट दिली आहे. सिल्वर ओक मध्ये अनौपचारिक रित्या अनेक नेत्यांनी शरद पवारांना तुम्हीच अध्यक्षपदी राहा आणि राष्ट्रवादी साठी कार्याध्यक्ष नेमा, असा तडजोडीचा तोडगा सुचविला. त्यावर देखील पवार 2 – 3 दिवसांत विचार करून अंतिम निर्णय देणार आहेत. याचा अर्थ पवारांनी अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या निर्णयापासून एक पाऊल मागे घेतले आहे आणि ते मूळ निर्णयाचा फेरविचार करणार असल्याने

    खुंटा हलवून केला बळकट
    डोळ्यातून काढले पाणी
    निवृत्तीचा निर्णय ढळला??
    पण खुर्चीवर बसे ना कोणी!!

    अशीच त्यांची अवस्था आली आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

    Sharad Pawar quit as NCP president, but may rethink his own decision in a day or two

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस