• Download App
    आज वसंतदादांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल! अशी बोचरी टीका शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांच्या बंडा नंतर का केली ?|Sharad Pawar pullod prayog .. Dr Shalinitai patil comment. After Ajit DadaS decision.

    आज वसंतदादांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल! अशी बोचरी टीका शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांच्या बंडा नंतर का केली ?

    वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून शरद पवार यांचा पहिला” पुलोद प्रयोग” नेमका कसा होता? आणि हा” पुलोद प्रयोग “आणि शालिनीताई च्या या बोचऱ्या प्रतिक्रियेचा नेमका संदर्भ काय?


    विशेष प्रतिनिधी 

    पुणे : दोन जुलै राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राजकीय खेळी करत आपल्याच काकांच्या विरोधात जात भाजपाशी घरोबा केला आणि थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा सगळा सत्ता संघर्ष सुरू असताना समाज माध्यमातून आणि आणि राजकीय क्षेत्रातून अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया उमटल्या. यामध्ये सगळ्यात जास्त लक्षात राहिली ती. माजी मंत्री डॉक्टर शालिनीताई पाटील यांची प्रतिक्रिया. आज खऱ्या अर्थानं वसंतदादा यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल! असं म्हणत अनेक वर्षाची खदखद शालिनीताईंनी बाहेर काढली Sharad Pawar pullod prayog .. Dr Shalinitai patil comment. After Ajit DadaS decision.

    महाराष्ट्राच्या राजकारणात माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील या शरद पवारांच्या राजकीयं कट्टर विरोधक समजल्या जातात मात्र शालिनीताई यांचा शरद पवार यांनच्यावर एवढा कडवा राग कां? त्या पाठीमागे हे एक कारण..



    तो काळ होता 1977 चा . 25 जून 1975 ला इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. आणि या आणीबाणीमुळे अख्खा देश ढवळून निघाला .पुढे 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी मागे घेण्यात आली आणि देशात लोकसभा निवडणुकाही झाल्या.आणीबाणीवेळी शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणीबाणीनंतर वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री बनले.आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला.इंदिरा गांधी यांना देशभरातून होणारा विरोध लक्षात घेता पक्षांतर्गत चलबिचल सुरू झाली. इंदिरा गांधी यांचं नेतृत्व स्वीकारण्यावरून काँग्रेस पक्ष दुभंगला. ‘इंदिरा गांधीनिष्ठ’ आणि ‘काँग्रेस पक्षनिष्ठ’ असे गट निर्माण झाले.

    राष्ट्रीय पातळीवर इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन गट निर्माण झाल्याचा परिणाम महाराष्ट्रातही झाला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये फूट पडली. वसंतदादा पाटील, शरद पवार अशी मंडळी यशवंतरावांसोबत म्हणजेच रेड्डी काँग्रेसमध्ये गेले, तर नासिकराव तिरपुडेंसारखे नेते इंदिरा काँग्रेसमध्ये राहिले.

    “देश पातळीवरील काँग्रेस फुटीमुळे महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं पार कोलमडून गेली होती. पर्यायाने या सगळ्या घडामोडींचा परिणाम 1978 च्या विधानसभा निवडणुकीतही झाला,”1978 सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या. आणीबाणीमुळे इंदिरा गांधींवरील जनतेचा राग एव्हाना कमी झाला नव्हता. याचा फटका जसा इंदिरा काँग्रेसला बसला, तसाच रेड्डी काँग्रेसलाही बसला. परिणामी जनता पक्षाने 99 जागांसह महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवलं आणि इंदिरा काँग्रेसला 62, तर रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या.

    “त्यात शेतकरी कामगार पक्षाला 13, माकपला 9 आणि अपक्षांना 36 जागा मिळाल्या होत्या. कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळं राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती,”ब्रम्हानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातलं सरकार चालवावं, अशी इंदिरा गांधी यांनी इच्छा व्यक्त केलीत्यानुसार महाराष्ट्रात रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांची आघाडी झाली.

    7 मार्च 1978 रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपत घेतली या मंत्री मंडळात शरद पवार हे या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते. अवघ्या तीन महिन्यानंतरचं महाराष्ट्रच्या राजकारनात सगळ्यात मोठा आणि पहिला भूकंप झाला. आणि त्याचे शिल्पकार म्हणून शरद पवार यांचे नाव घेतल्या गेलं.

    1978 सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. हे अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार यांनी 40 आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यांसारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला.पवारांच्या बंडखोरीमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसचं सरकार अल्पमतात आल्याने वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडेंनी राजीनामे दिले. परिणामी महाराष्ट्रातील पहिलं आघाडी सरकार अवघ्या साडेचार महिन्यात कोसळलं आणि वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडावं लागलं. आणि पुरोगामी लोकशाही दल किंवा पुलोदची स्थापना करून शरद पवारांनी राज्यातलं पहिलं आघाडी सरकार स्थापन केलं होतं. वयाच्या 38 व्या वर्षी ते मुख्यमंत्री बनले. नाट्यमय घडामोडीनंतर ते मुख्यमंत्री झाले.. अशाप्रकारे पक्ष फोडण्याचा प्रकार पहिल्यांदी महाराष्ट्रात घडला. आणि शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असा इतिहास राजकीय पटलावर लिहिला गेला.

    शालिनीताईंच्या मते आज ती पुनरावृत्ती झाली. आणि म्हणूनच वसंतदादांच्या आत्म्याला आज शांती मिळाली असेल अशी प्रतिक्रिया डॉक्टर शालिनी पाटील यांनी माध्यमांना दिली.

    Sharad Pawar pullod prayog .. Dr Shalinitai patil comment. After Ajit DadaS decision.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!