• Download App
    खरा वारसदार कोण, मुलीशिवाय आहेच कोण??; राष्ट्रवादीकडून पवारांचा "पुरोगामी" व्हिडिओ शेअर!! Sharad pawar proposes dynasty politics in his interview in progressive language

    खरा वारसदार कोण, मुलीशिवाय आहेच कोण??; राष्ट्रवादीकडून पवारांचा “पुरोगामी” व्हिडिओ शेअर!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय वारसा आपल्याच मुलीकडे म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णयकक्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांचा एक जुना मुलाखतीचा “पुरोगामी व्हिडिओ” आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर केला आहे. पवार सुप्रिया सुळे यांच्या जन्मानंतर एकाच मुलीवर थांबले. याचा उल्लेख या व्हिडिओतून ठळकपणे करण्यात आला आहे. पवारांची पुरोगामी प्रतिमा महाराष्ट्रावर ठसविण्याचा यातून प्रयत्न झाला आहे. Sharad pawar proposes dynasty politics in his interview in progressive language

    घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते, असा पुरोगामी विचार शरद पवार साहेबांसारखा द्रष्टा नेताच रुजवू शकतो, अशी प्रतिमा निर्मिती करणे हा व्हिडिओ शेअर करण्याचा हेतू आहे.

    शरद पवार मुख्यमंत्री असताना दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी सह्याद्री वाहिनीवर त्यांची मुलाखत घेतली होती. त्यातला हा अंश भाग राष्ट्रवादी काँग्रेसने शेअर केला आहे. जब्बार पटेल हे शरद पवारांचेच समर्थक मानले जातात. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जब्बार पटेल यांनी यशवंतराव चव्हाणांवरच्या बायोपिकचे दिग्दर्शन केले होते. पण तो बायोपिक महाराष्ट्रात फारसा चालला नाही.

    जब्बार पटेल यांनी शरद पवारांना त्या मुलाखतीत प्रश्न विचारला होता, की आपल्या देशात मुलगा हा वंशाचा दिवा असे मानत असताना तुम्हाला एकच मुलगी का? या प्रश्नांना कसे सामोरे जाता?? यावर शरद पवार म्हणाले, हा प्रश्न अनेकदा मला विचारला जातो. ग्रामीण भागात गेल्यानंतर हा प्रश्न मला कायम विचारला जातो. मुलगा असता तर बरे झाले असते. शेवटी नाव चालवण्यासाठी, बर वाईट झाल्यानंतर अग्नी देण्यासाठी मुलगा पाहिजे, असे म्हटले जाते. माझ्या मते हा प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टीकोन आहे. अग्नी देण्यासाठी कोणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची का जिवंत असताना नीटनेटक वागण्याची चिंता करायची?? मुलगा आणि मुलगी यांच्याकडे पाहण्याचा जो समाजाचा दृष्टीकोन आहे. तो टाकून दिला पाहिजे. मुलीला मुलाप्रमाणे वाढवून, समान संधी देऊन  आत्मविश्वास वाढवून तिच्याकडून उत्तम काम करुन घेऊ शकतो, याची खात्री मला आहे, असे शरद पवार म्हणाले.

    शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वारसदार कोण असणार, नेतृत्व कुणाकडे असणार? अशी चर्चा अनेकदा होत असते. त्यानंतर शरदचंद्र पवार गटाकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आले आहे.

    Sharad pawar proposes dynasty politics in his interview in progressive language

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस