विशेष प्रतिनिधी
Sharad Pawar केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाकच्या कुरापतींविरोधात विविध देशांत सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली होती. त्यानतंर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी पक्षीय राजकारण करण्याची काहीही गरज नसल्याचे ठणकावून सांगत संजय राऊतांना खडेबोल सुनावलेत.Sharad Pawar
मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर व दहशतवादाच्या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टमंडळात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विविध नेत्यांचा समावेश आहे. संजय राऊत यांनी या शिष्टमंडळाचा उल्लेख वऱ्हाड असा केला होता. तसेच इंडिया आघाडीतील या शिष्टमंडळातील सदस्यांना या वऱ्हाडावर बहिष्कार टाकण्याचेही आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर स्थानिक राजकारण नको
शरद पवार यासंबंधी म्हणाले की, हा निर्णय पक्षाचा नसतो. नरसिंह राव यांचे सरकार होते, तेव्हा महाराष्ट्राचे शिष्टमंडळ नेमले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिष्टमंडळ नेमण्यात आले होते. वाजपेयींच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळात माझाही सदस्य म्हणून समावेस होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्न येतात तेव्हा पक्षीय भूमिका घ्यायची नसते.
आज सरकारने शिष्टमंडळ स्थापन केले. त्यांना देश वाटून दिले. भारताची भूमिका काय आहे? ती सांगण्यासाठी हे शिष्टमंडळ विविध देशा्ंत जाणार आहे. त्यांचे मत काय आहे हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या पक्षाचे एक सदस्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कुणीही इथे स्थानिक राजकारण आणू नये अशी माझी भूमिका आहे, असे ते संजय राऊत यांना टोला हाणताना म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत या प्रकरणी म्हणाले होते की, आमच्या पक्षाचे लोकसभेत 9 खासदार आहेत. शरद पवार गट व एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या तुलनेत आमचा एक सदस्य जास्त आहे. लोकसभेतील आमच्या सदस्याला पाठवण्यासाठी आम्हाला विचारणा केली का? खरे म्हणजे एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळावयास हवी होती. पण सरकारने इथेही राजकारण केल्याचे स्पष्ट होते.
सरकारी खर्चाने हे वऱ्हाड परदेशात पाठवण्याची तशी काहीच गरज नव्हती. पण आता हे वऱ्हाड युरोप व आफ्रिकेला निघाले आहे. ते तिथे जाऊन काय करणार? परदेशात आपले हायकमिशन आहे. ते काम करत आहे. मग या शिष्टमंडळाची गरज काय होती? जगात हे प्रश्न घेऊन जात आहेत याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत. पंतप्रधान स्वतः 200 देश फिरले. पण त्यानंतरही एकही देश पाठिशी उभा राहिला नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही नौंटकी करण्याची वेळ आली. इंडिया ब्लॉकच्या सदस्यांनी या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे ते म्हणाले.
Sharad Pawar pricks Sanjay Raut’s ears; He should not take a partisan stand on international issues!
महत्वाच्या बातम्या
- Lashkar-e-Taiba : पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा दहशतवादी सैफुल्ला खालिदची हत्या!
- Solapur fire tragedy : सोलापूर आग दुर्घटना : पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून पीडितांना आर्थिक सहाय्य
- Hyderabad हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळला, आयसिसशी संबंधित दोन जणांना अटक
- YouTuber Priyanka Senapati : ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणात ओडिशातील यूट्यूबर प्रियांका सेनापती संशयाच्या भोवऱ्यात