विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी सहा पक्षांमध्ये होत असली, तरी प्रत्यक्षात शरद पवार यांची प्रतिष्ठा प्रामुख्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी लढण्यातच पणाला लागली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीच्या लढती भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी देखील आहेत, पण त्या लढती प्रामुख्याने भाजप आणि शिंदे यांच्या बालेकिल्लात असल्याने पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रभाव तिथे फारच मर्यादित आहे. त्यामुळे तिथे पवारांनी प्रतिष्ठा पणाला लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तिथे पवारांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा टेकू घेऊन लढायचा प्रयत्न चालवला आहे. Sharad Pawar
परंतु अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांची प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील लढत दोघांच्या दृष्टीने फार प्रतिष्ठेची बनली आहे. या भागातील तब्बल 37 विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन्ही नेत्यांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत त्यातही शरद पवार यांनी सोलापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये ताटातले वाटीत करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवार खेचून तुतारी चिन्हावर उभे केले आहेत त्यामुळे पवारांची प्रतिष्ठा टिकवायची कशी हे अजित पवारांचे उमेदवार एक प्रकारे ठरवणार आहेत. Sharad Pawar
पवारांच्या राष्ट्रवादीचा विदर्भात प्रामुख्याने भाजपशी सामना होत आहे. परंतु मूळातच विदर्भामध्ये काँग्रेस आणि भाजप हेच दोन बळकट पक्ष असल्याने पवारांची राष्ट्रवादी तिथे काँग्रेसच्या टेकूवर भाजपशी लढायचा प्रयत्न करत आहे, तर मुंबई, ठाणे आणि कोकणपट्ट्यांमध्ये जे निवडक मतदारसंघ पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहेत, तिथे पवारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा टेकू घ्यावा लागला आहे. त्यामुळे पवारांची खरी लढत ही पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात अजित पवारांच्याच राष्ट्रवादीशी आहे. त्या लढती मध्येच खऱ्या अर्थाने पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्या मतदारसंघांची संख्या 37 आहे. Sharad Pawar
Sharad pawar’s prestige at stake in fight with ajit pawar
महत्वाच्या बातम्या
- Bhaskar Jadhav रामटेकमधील बंडखोरीवरुन भास्कर जाधवांनी काँग्रेसला सुनावले; ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का?
- Chandrashekhar Bawankule उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
- Devendra Fadnavis संविधानाबद्दल राहुल गांधींची अनास्था दिसली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नागपुरात टीका
- Sadhvi Pragya ‘मी जिवंत राहिले तर नक्कीच कोर्टात जाईन…; काँग्रेसने गंभीर अत्याचार केल्या साध्वी प्रज्ञा यांचा आरोप