• Download App
    Sharad Pawar presented with meditation books; Will this achieve "Rajyoga"??, discussion in political circles!! शरद पवारांना ध्यानधारणेची पुस्तके भेट; यातून तरी साध्य होणार का "राजयोग

    शरद पवारांना ध्यानधारणेची पुस्तके भेट; यातून तरी साध्य होणार का “राजयोग”??, राजकीय वर्तुळात चर्चा!!

    Sharad Pawar

    नाशिक : एरवी स्वतःला नास्तिक म्हणणाऱ्या शरद पवारांना ध्यानधारणेची पुस्तके भेट मिळाली आणि त्याबरोबर perfect political timing साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. देव देव करण्यापासून दूर राहिलेल्या शरद पवारांना ध्यान धारणेची पुस्तके भेट दिली आणि ती त्यांनी स्वीकारली याचे बरेच राजकीय अर्थ मुंबईच्या राजकीय वर्तुळात काढले गेले. शरद पवारांनी आत्तापर्यंत “राजयोग” साधायचे बरेच प्रयत्न केले, पण ते सगळे भौतिक पातळीवरचे होते. आता ध्यानधारणेने द्वारे तरी त्यांना या वयात “राजयोग” साध्य होईल का??, असा सवाल राजकीय वर्तुळातून समोर येतोय.Sharad Pawar presented with meditation books; Will this achieve “Rajyoga”??, discussion in political circles!!

    शरद पवार कधी देव देव करत नाहीत. ते कुठल्या देवळातही जात नाही. देवळात गेले तरी मटण खाल्ल्याच्या निमित्ताने ते देवळा बाहेरूनच देवाला नमस्कार करतात. देवळातला देव घडविणाऱ्याची कविता वाचताना ते आपण देवाचे बाप असल्याचे सांगतात. आपली पुरोगामी प्रतिमा जपण्यासाठी शरद पवार नेहमीच जागरूक असतात. ते नियमितपणे इफ्तार पार्टीमध्ये मात्र व्यवस्थित सामील होतात. पण शरद पवार कधी ध्यान धारणेकडे वळल्याचे दिसले नाही. त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती पण नंतर ती त्यांनी मागे घेतली. त्यामुळे बऱ्याच मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. पण तेव्हा सुद्धा शरद पवार ध्यान धारणेकडे वळले नव्हते.



    पण कालच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्व महाविद्यालयाने शरद पवारांना ध्यान धारणेची पुस्तके भेट दिली. त्यामुळे पवारांच्या धार्मिक आणि सामाजिक विचारांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

    जगभरातील तब्बल १४३ देशांत ध्यानधारणेचे धडे शिकवणाऱ्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वतीने शरद पवार यांना ध्यानधारणेची पुस्तके भेट देण्यात आली. अहिल्यानगरमधील हॉटेल यश ग्रँड येथे शरद पवार यांची विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक बी. के. डॉ. दीपक हरके यांनी भेट घेतली. त्यांनी शरद पवार यांना ध्यानधारणेविषयी मार्गदर्शन करत, ध्यानधारणेची पुस्तके भेट दिली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे आणि बी. के. पांडुरंग हे देखील उपस्थित होते.

    – राजयोग ध्यान

    ध्यान धारणेबाबत मार्गदर्शन करत असताना ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. हरके यांनी सांगितले की, ध्यानामध्ये “राजयोग” ध्यान हा नावाचा एक प्रकार पाहायला मिळतो. जो प्रकार सर्व पार्श्वभूमीच्या लोकांना करता येऊ शकतो. या प्रकारात कोणत्याही विधी किंवा मंत्राशिवाय ध्यान केले जाते. विशेष म्हणजे राजयोग ध्यान या प्रकाराचा सराव तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता. राजयोग ध्यान या प्रकाराचा सराव हा उघड्या डोळ्यांनी केला जातो. ज्यामुळे ध्यान करण्याची पद्धत ही बहुमुखी, सोप्या स्वरूपाची आणि सरावासाठी सहज अशी बनून जाते. ध्यान ही एक अशी अवस्था आहे, जी आपल्या दैनंदिन जीवनातील चेतनेच्या पलीकडची असते. तिथून आपले अध्यात्मिक सशक्तीकरण सुरू होते. ध्यानधारणा आणि योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व यावेळी त्यांनी चांगल्या प्रकारे समजून सांगितले.

    अध्यात्मिक जागरूकता ही आपल्याला नकारात्मक आणि व्यर्थ असलेल्या विचारांपासून दूर राहून चांगले आणि सकारात्मक विचार निवडण्याची शक्ती देत असते. परिणामी त्यामुळे आपण आपल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी चांगल्या विचारांना प्रतिसाद देऊ लागतो. आपण सुसंवादाने जगू लागतो. अधिक चांगले, आनंदी आणि निरोगी असे संबंध निर्माण करतो. या सगळ्यातून आपल्याला आपले जीवन हे सकारात्मक मार्गाने घेऊन जाण्यास मदत होते. ध्यानधारणा आपल्या दैनंदिन जीवनात किती गरजेची आहे. हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. निरोगी आणि ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी ध्यानधारणा हा एक उत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    – पवार साधणार का “राजयोग”??

    शरद पवार यांनी त्यांचे हे सगळे म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळेच आता ध्यानधारणेद्वारे शरद पवार आपला मनातला “राजयोग” साध्य करून घेणार की काय??, याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले.

    Sharad Pawar presented with meditation books; Will this achieve “Rajyoga”??, discussion in political circles!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Kalpana Bhagwat : बनावट आयएएस महिलेवर पाकसाठी हेरगिरीचा संशय; बॉम्बस्फोट काळात दिल्ली, उदयपूर, मणिपूरचा प्रवास

    पार्थ पवार जमीन घोटाळ्यात अमेडिया कंपनीने काय आणि कोणते झोल केले??

    दादा भुसेंना राष्ट्रवादीच्या संस्कारांची लागण; एकनाथ शिंदेंच्या पेक्षा दादांनाच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची तहान!!