• Download App
    शरद पवार वर्षा बंगल्यावर, चर्चेला उधाण; पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा खुलासा|Sharad Pawar on Varsha bungalow, sparks discussion; But the Chief Minister disclosed that there was no political discussion

    शरद पवार वर्षा बंगल्यावर, चर्चेला उधाण; पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा खुलासा

    प्रतिनिधी

    मुंबई : सध्या राज्यात जलद गतीने राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यात अनिश्चिततेचे राजकारण पाहता कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यातच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुंबईतील वर्षा या निवासस्थानी पोहोचले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.Sharad Pawar on Varsha bungalow, sparks discussion; But the Chief Minister disclosed that there was no political discussion

    अर्थातच मराठी प्रसार माध्यमाची जोरदार चर्चा सुरू झाली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला. उद्धव ठाकरे सध्या प्रदेश दौऱ्यावर आहे आणि शरद पवार अचानक वर्षावर दाखल झाले त्यामुळे मोठ्या चर्चेला उधाण आले असले तरी यात राजकीय चर्चा कोणतीही झाली नाही. शरद पवार ज्या मराठा मंदिर संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्या संस्थेचा अमृत महोत्सव आहे म्हणून त्याचे निमंत्रण देण्यासाठी पवार आले होते, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. याखेरीज कलावंत आणि शाळांचा विषय चर्चेला आला, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मात्र या भेटीवर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

    या भेटीत त्यांनी नेमके कोणत्या विषयावर चर्चा केली याची माहिती अद्याप नाही. मात्र, शरद पवार काही कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आणि या आघाडीचे जनक म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. त्यामुळे, शरद पवारांची ही भेट कामानिमित्त असली तर याची राजकीय चर्चा राज्याच्या वर्तुळात होत आहे. या भेटीची अनेक पैलूंनी चर्चा केली जात आहे.

    Sharad Pawar on Varsha bungalow, sparks discussion; But the Chief Minister disclosed that there was no political discussion

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!