• Download App
    कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी |Sharad Pawar, Nitin Gadkari honoured with 'Doctor of Science' by Mahatma Phule Agriculture University

    कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज ; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा दीक्षांत समारंभ गुरुवारी पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शरद पवार व नितीन गडकरी यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने गौरविण्यात आले. Sharad Pawar, Nitin Gadkari honoured with ‘Doctor of Science’ by Mahatma Phule Agriculture University


    प्रतिनिधी

    अहमदनगर : “कोवीड काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचं काम देशाच्या शेती क्षेत्रानं केलं आहे. तेव्हा शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत,” असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केले.

    राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवी प्रदान (दीक्षांत) समारंभ गुरुवारी (ता. 27) पार पडला. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी स्नातकांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन केले. व्यासपीठावर केंद्रिय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार, राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती दादा भुसे, उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू



    डॉ. नरेंद्र सिंह राठौड, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील,अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ उपस्थित होते. यावेळी खासदार शरद पवार आणि नितीन गडकरी यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानीत करण्यात आले.

    राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये उत्कृष्ट दर्जाचे संशोधनाचे काम होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करत नावीन्यपूर्ण काम झाले आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती ठेवत काम केल्यास देशाची वाटचाल विकासाकडे होईल. तसेच कृषी विद्यापीठांनी आपल्या मराठी मातृभाषेचा सन्मान करत कृषी व तंत्रज्ञानाचे शिक्षण व कामकाज मराठी भाषेतून करण्यावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांनी अधिकाधिक पेटंट प्राप्त करावेत. सेंद्रिय व जीआय तंत्रज्ञानावर आधारित शेती व्हावी. यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे ही कोश्यारी यांनी सांगितले.

    शरद पवार व नितीन गडकरी यांनी कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला मार्गदर्शक काम केले आहे. त्यांना दिलेल्या डी.एस्सी पदवीमुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे, असे गौरवोद्गार कोश्यारी यांनी काढले.पदवीदान समारंभात दोन वर्षातील विविध विद्याशाखांतील एकुण ११ हजार ४६८ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात आले. त्यात विविध विद्याशाखातील दहा हजार ७३६ स्नातकांना पदवी, ६२८ स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर १०४ स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित करण्यात आले.

    मराठीचा आग्रह

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांचा मराठी भाषेचा आग्रह दिसून आला. आजच्या दीक्षांत समारंभ प्रास्ताविक सुरू असतांनाच त्यांनी कुलगुरूंना पुढील प्रास्ताविक व कार्यक्रम मराठी भाषेत करण्याच्या सूचना केल्या.

    Sharad Pawar, Nitin Gadkari honoured with ‘Doctor of Science’ by Mahatma Phule Agriculture University

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना