विशेष प्रतिनिधी
मुंबई : वयाच्या 84 व्या वर्षी शरद पवारांना स्वतःच्या पक्षाचे नवे नाव आणि नवे चिन्ह घ्यायची वेळ आली. कारण निवडणूक आयोगाने कायदा आणि नियमानुसार त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह त्यांच्याकडून काढून घेऊन बहुमताच्या आधारे ते अजित पवारांकडे सोपविले. त्यामुळे शरद पवार गटाची तातडीची बैठक होऊन उद्या निवडणूक आयोगाकडे “मी राष्ट्रवादी पार्टी” किंवा “स्वाभिमानी राष्ट्रवादी पार्टी” यापैकी एक नाव सुचवून महाराष्ट्रात सध्या कोणत्याही पक्षाकडे नसलेले “उगवता सूर्य” हे चिन्ह मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे ठरविण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. sharad pawar new party name and sign
राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार गटाला स्वतःच्या पक्षाचे नवे नाव आणि नवे चिन्ह निवडावेच लागणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांना आज दुपारी 3.00 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. त्या मुदतीच्या आत पक्षाचे नवे नाव आणि नवे चिन्ह कळवायचे असल्यामुळे “मी राष्ट्रवादी पार्टी” किंवा “स्वाभिमानी राष्ट्रवादी पार्टी” या दोन नावांपैकी एक नाव पक्षाला मिळावे आणि “उगवता सूर्य” हे चिन्ह मिळावे, असा अर्ज शरद पवार गट करणार असल्याची बातमी आहे. अर्थात नवे नाव आणि चिन्ह सुचविण्याचे निवडणूक आयोगाने सांगितल्याने शरद पवार गटाने सुचवलेल्यापैकीच एक नावावर निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे “मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी”, असे थीम सॉंग होतेच. त्यामुळे पक्षाने “मी राष्ट्रवादी पार्टी” असे नाव घेतल्याची चर्चा आहे, त्याचबरोबर शरद पवारांचे समर्थक त्यांच्या नावाची नेहमी “स्वाभिमान” हा शब्द जोडतात. आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा संपूर्ण पक्षच अजित पवारांच्या पारड्यात टाकला असला, तरी पक्षाच्या नावात “राष्ट्रवादी” आणि “स्वाभिमान” हे दोन्ही शब्द घालून पक्षाचे “स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पार्टी” असे नवे नाव घेण्याचेही घाटत आहे. पक्षाने कोणतेही नवे नाव अथवा चिन्ह घेतले, तरी ते जास्तीत जास्त शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाशी संलग्न असावे याची काळजी स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे घेत आहेत. कारण फक्त शरद पवार नावाच्या ब्रँडवरच त्यांना आता इथून पुढे राजकीय वाटचाल करायची आहे.
sharad pawar new party name and sign
महत्वाच्या बातम्या
- अबकी बार 400 पार वगैरे ठीक, पण मोदींनी भाजपसाठी लोकसभेत सांगितलेल्या 370 आकड्याचा नेमका अर्थ काय??
- मोदींनी लोकसभेत नेहरूंचे नाव घेतले; राहुल गांधींच्या निकटवर्ती खासदाराने सावरकरांना वादात ओढले!!
- लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी निवडणूक आयोगाचा मोठा आदेश
- अबकी बार NDA 400 पार, भाजपा 370; पंतप्रधान मोदींनी लोकसभेतल्या भाषणात सेट केले “टार्गेट”!!