• Download App
    Sharad Pawar पवारांनी वारकरी संप्रदायात "घुसलेले" "प्रतिगामी" "शोधले"; पण त्यांना स्वतःच्याच पक्षातले दर्शनाचा काळाबाजार मांडणारे नेते नाही दिसले!!

    पवारांनी वारकरी संप्रदायात “घुसलेले” “प्रतिगामी” “शोधले”; पण त्यांना स्वतःच्याच पक्षातले दर्शनाचा काळाबाजार मांडणारे नेते नाही दिसले!!

    नाशिक : शरद पवारांनी वारकरी संप्रदायात “घुसलेले” “प्रतिगामी” “शोधून” काढले, पण त्यांना स्वतःच्याच पक्षातले दर्शनाचा काळाबाजार मांडणारे नेते नाही दिसले!!, असेच म्हणायची वेळ शरद पवारांच्या लेखामुळे आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर मधल्या दर्शन काळा बाजारात अडकलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या अटकेमुळे आले.

    – शरद पवारांचा

    शरद पवारांनी दिल्लीतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्मरणिकेमध्ये लेख लिहून वारकरी संप्रदायात घुसलेले तथाकथित प्रतिगामी “शोधले”. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचे कढ काढले. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये काही प्रतिगामी लोक घुसलेत. ते वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात जाऊन मांडणी करतात, असा दावा पवारांनी त्या लेखामध्ये केला.

    पवारांच्या या लेखामुळे महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वाद उफाळून वर आला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफानी हल्ला केला. हा सगळा गदारोळ पवारांनी दिल्लीत बसून पाहिला.

    – पवारांच्या नेत्याला त्र्यंबकेश्वर मध्ये अटक

    पण त्या पाठोपाठ आज त्र्यंबकेश्वर मधल्या दर्शन काळाबाजारचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पास काढून दर्शन मिळणार नाही. त्याऐवजी 3000 रुपये दिले तर दर्शन घेऊ देऊ, असा दावा करणाऱ्या दलालांना नाशिक पोलिसांनी अटक करून दणका दिला. या अटक केलेल्या मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग याचा समावेश राहिला. हा पुरुषोत्तम कडलग आणि त्याच्या टोळीने त्रंबकेश्वर मंदिरा बाहेर दर्शनाचा काळाबाजार मांडला होता. भाविकांकडून हजारो रुपये उकळून त्र्यंबकेश्वरचे मंदिरात जाऊन दर्शन घडविण्याचा त्यांचा “खेळ” चालला होता. तो “खेळ” आज पोलिसांनी उद्ध्वस्त केला.

    – पवार आणि त्यांच्या चेल्यांचा पर्दाफाश

    पण ज्या शरद पवारांनी वारकरी संप्रदायात तथाकथित घुसखोरी केलेले तथाकथित प्रतिगामी “शोधून” काढले, त्या शरद पवारांना स्वतःच्या पक्षातला दर्शनाचा काळाबाजार मांडणारा नेता कधी दिसला नाही. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी कधी तपासावी, असे पवारांना किंवा त्यांच्या चेल्यांना वाटले नाही. पवार आणि त्यांचे प्रवक्ते फक्त पुरोगामीत्वाचे ढोल बडवत राहिले आणि त्यांचे दुसरे चेले मंदिरात दर्शनाचा काळाबाजार मांडत राहिले. पण पोलिसांच्या आजच्या कारवाईमुळे पवार आणि त्यांचे चेले दोन्हीही उघडे पडले.

    Sharad Pawar NCP leader arrested in Trimbakeshwar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दीर्घकाळाचे राजकीय स्वप्न साकार; हिंदी पट्ट्यातल्या बिहारच्या मुख्यमंत्री पदावर भाजपचे सम्राट चौधरी!!

    डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुण्यात विविध ठिकाणी अभिवादन आणि सामाजिक उपक्रम

    तामिळनाडूत लाडक्या बहिणींवर आणि शेतकऱ्यांवर भाजपचा सवलतींचा वर्षाव, २००० पासून ते ५० लाखांपर्यंतच्या योजनांवर भर!!