• Download App
    Sharad Pawar ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर पवारांच्या पक्षात आनंदाच्या उकळ्या; पण पवारांचा विचार चालू यातून भाजायच्या कशा राजकीय पोळ्या??

    ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर पवारांच्या पक्षात आनंदाच्या उकळ्या; पण पवारांचा विचार चालू यातून भाजायच्या कशा राजकीय पोळ्या??

    नाशिक : ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर पवारांच्या पक्षात आनंदाच्या उकळ्या; पण पवारांचा विचार चालू यातून कशा भाजायच्या राजकीय पोळ्या??, अशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची अवस्था झाली आहे.

    हिंदी सक्ती विरोधातल्या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार. एकच मोर्चा काढणार, असे ट्विट संजय राऊत यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले. ठाकरे बंधूंच्या एकजुटीच्या बातम्यांनी मराठी माध्यमे भरून गेली. एरवी ठाकरे या शब्दाची अलर्जी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आनंद व्यक्त करणारी ट्विट केली. सांगलीच्या राजकारणातले “तेज” गमावलेल्या सतेज पाटलांनी बंधू ऐक्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.

    त्यापलीकडे जाऊन तर शरद पवारांचा नातू रोहित पवारांनी “महाराष्ट्र द्रोह्यांना धडकी” भरवली. मराठी अस्मितेसाठी मराठीच्या हितासाठी दोन बंधू एकत्र येत असतील, तर तो मराठी मनांसाठी आनंदाचा क्षण असेल. मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्र द्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असे ट्विट रोहित पवारांनी केले.

    ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या बातमीमुळे महाराष्ट्र द्रोह्यांचा जळफळाट झाला असेल, असे ट्विट रोहिणी खडसे यांनी केले.

    – पवारांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

    ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या बातमीचा पवारांच्या पक्षाला असा आनंद झाला. पण खुद्द पवारांनी मात्र त्याबद्दल सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. हिंदी सक्ती विरोधातल्या मोर्चात शरद पवारांनी सामील व्हावे, असे निमंत्रण राज ठाकरेंनी दिले. पण नुसते निमंत्रण देऊन मोर्चात सहभागी होता येत नाही. आधी दोन्ही बंधूंची भूमिका समजावून घेतली पाहिजे. त्यांची भेट घेतली पाहिजे. नंतर भूमिका जाहीर करू, असे शरद पवार म्हणाले. कारण ठाकरे बंधूंचे ऐक्य भाजपच्या विरोधात असले तरी ते मते फोडण्याच्या दृष्टीने आपल्याच पक्षाच्या मुळावर तर येणार नाही ना??, याची भीती शरद पवारांना वाटली. त्यामुळे त्यांनी सावध पवित्रा घेत मोर्चात सामील व्हायचे की नाही याविषयी संदिग्धता ठेवली.

     


    ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या मोर्चात शरद पवार सामील झाले, तर मराठी माध्यमांचे कव्हरेज विभागले जाईल. ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर “फोकस” ठेवण्याबरोबरच पवारांवर “फोकस” ठेवण्याची कसरत अवघड होईल. पण काही झाले तरी पवारांना स्वयंभू आणि स्वतंत्र “फोकस” मिळणार नाही. त्यामुळे पवार मोर्चात सहभागी होतील की नाही, याविषयी दाट संशय आहे. त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या ऐक्याची आज घोषणा झाली असली तरी अजून मोर्चाला 9 अवधी असल्याने या दरम्यानच्या काळात पवार नेमके काय करतील, दोन्ही बंधूंच्या ऐक्यामध्ये कोणत्या प्रकारचे अडथळे आणतील याविषयी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. कारण ठाकरे बंधूंचे ऐक्य भाजपच्या विरोधात असले तरी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते सोडून मोठे होणार आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या ऐक्याची भाजप पेक्षा पवारांना अधिक चिंता आहे.

    त्यामुळे पवार आगामी 9 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या ऐक्यात काडी घातल्याशिवाय राहणार नाहीत, असा राजकीय वर्तुळाचा होरा आहे. राज ठाकरेंचा शिवसेनेतला राजीनामा लिहिणारे संजय राऊत आज पवारांच्या अधिक जवळ आहेत. त्यांनीच ठाकरे बंधूंच्या ऐक्याचे ट्विट करून मोर्चाची माहिती दिली. त्यामुळेही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पवारांच्या पुढच्या खेळीची जास्त उत्सुकता आहे.

    Sharad Pawar NCP happy over Thackrey brothers unity, but Sharad Pawar’s stand volatile

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे म्हणाले- वाद टाळण्यासाठी शरद पवारांच्या नावाला संमती दिली, आता मोठी प्रतीक्षा करावी लागणार

    CM Devendra Fadnavis : सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी

    Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेतकरी कर्जमाफी ते लाडकी बहीण, वाचा सर्वकाही एका क्लिकवर