• Download App
    संजय राऊत अटक : शरद पवार दिल्लीत पोहोचले, मोघम बोलले, गाडीत जाऊन बसले!!Sharad Pawar makes casual comments on Sanjay Raut's arrest by ED

    संजय राऊत अटक : शरद पवार दिल्लीत पोहोचले, मोघम बोलले, गाडीत जाऊन बसले!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केल्यानंतर शरद पवार प्रथमच बोलले… पण ते मोघम बोलले आणि गाडीत जाऊन बसले, अशा आशयाची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. Sharad Pawar makes casual comments on Sanjay Raut’s arrest by ED

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज सोमवारी सकाळी राजधानी नवी दिल्लीत दाखल झाले. पत्रकारांनी त्यांना विमानतळावर गाठतानाच संजय राऊत यांच्या अटके विषयी प्रश्न विचारले. परंतु त्यावर फारसे भाष्य न करता शरद पवार पुढे चालत राहिले आणि नंतर गाडीत बसताना मला जे सांगायचे ते मी आधीच सांगितले आहे, असे म्हणून गाडीत बसून निघून गेले.



    राऊतांबद्दल मोदींकडे रदबदली

    याच शरद पवारांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संजय राऊत यांच्या ईडी चौकशी विषयी तक्रार मांडली होती. संजय राऊत हे पत्रकार आहेत. सामना या प्रतिष्ठित दैनिकाचे कार्यकारी संपादक आहेत. त्यांना केंद्रीय तपास संस्था ईडी त्रास देते आहे. हा त्रास थांबवा, अशी विनंती पवारांनी पंतप्रधान मोदींना केली होती. त्यावेळी तशा बातम्याही मराठी प्रसार माध्यमांमध्ये आल्या होत्या. संजय राऊत यांची त्यावेळी फक्त ईडीची चौकशी सुरू होती. त्यांना ईडीने नोटीसा पाठवल्या होत्या. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री नवाब मलिक हे दोघेही ईडीच्या कोठडीत होते. त्यांच्याविषयी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे रदबदली केल्याच्या बातम्या आल्या नव्हत्या. त्यांनी संजय राऊत यांच्या विषयी पंतप्रधान मोदींकडे रदबदली केल्याच्या बातम्या आल्या होत्या.

    प्रत्यक्ष अटकेनंतर मोघम प्रतिक्रिया

    या पार्श्वभूमीवर 1034 कोटी रुपयांच्या पत्राचा घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना जेव्हा प्रत्यक्ष अटक झाली, तेव्हा शरद पवार राजधानी दिल्लीत येऊन मोघम बोलले आणि गाडीत बसून निघून गेले अशा आशयाची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

    Sharad Pawar makes casual comments on Sanjay Raut’s arrest by ED

    महत्वाच्या बातम्या 

     

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!