• Download App
    Sharad Pawar विलासरावांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने, पण अजितदादांनी श्रेय दिले शरद पवारांना; पण ते सत्य किती??

    विलासरावांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने, पण अजितदादांनी श्रेय दिले शरद पवारांना; पण ते सत्य किती??

    नाशिक : विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने; पण अजितदादांनी त्याचे श्रेय दिले शरद पवारांना!!, असे आज लातूरमध्ये घडले. Sharad Pawar

    29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या अजित पवारांनी आज पुणे आणि पिंपरी चिंचवड सोडून बाकीच्या काही महापालिकांच्या परिक्षेत्रांमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभा घेतल्या. त्यात त्यांनी लातूरमध्ये सुद्धा सभा घेतली. या सभेत बोलताना अजित पवारांनी विलासरावांच्या मुख्यमंत्री पदाचे श्रेय शरद पवारांना देऊन टाकले.

    – रवींद्र चव्हाणांचा “सेल्फ गोल”

    लातूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा प्रचार करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी “सेल्फ गोल” केला होता. लातूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा आहे की ते विलासरावांची आठवण पुसू शकतील, असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले होते, पण ते वक्तव्य भाजपवरच उलटले. रवींद्र चव्हाण यांना त्याबद्दल माफी मागावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्या संदर्भात जाहीर खुलासा करावा लागला. पण त्यामुळे भाजपला ठोकून काढायची संधी काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांना मिळाली.

    – पवारांना फुकटचे श्रेय

    लातूर मधल्या सभेत अजित पवारांनी सुद्धा भाजपला ठोकून काढायची संधी साधून घेतली. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाची स्तुती केली. पण त्यांना मुख्यमंत्री करण्याचे श्रेय मात्र त्यांनी शरद पवारांना देऊन टाकले, जे फुकटचे होते. कारण विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने. पण शरद पवारांनी मनाचा मोठेपणा दाखवून विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री केले, असा दावा अजित पवारांनी जाहीर सभेत केला.



    – विलासराव कधीच पवार समर्थक नव्हते

    प्रत्यक्षात विलासराव देशमुख कधीच पवारांचे समर्थक म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले गेले नव्हते. उलट ते कट्टर पवार विरोधक होते आणि शंकरराव चव्हाण यांचे समर्थक होते. शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच विलासरावांचे नेतृत्व मराठवाड्यात तयार झाले होते. ते आणि सुशील कुमार शिंदे विलासराव आणि सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणात “दो हंसो का जोडा” म्हणून गाजले होते. काँग्रेसमध्ये ते कायमच पवार विरोधक म्हणूनच वावरले. शरद पवारांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस काढली, त्यावेळी कपिल कुमार शिंदे आणि विलासरावांनी त्यांच्याबरोबर जाणे पसंत केले नाही. उलट त्यांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले. काँग्रेसच्या हाय का मांडणे त्याबद्दल त्यांना मुख्यमंत्रीपदाची बक्षीस दिली. काँग्रेसने सुशीलकुमार आणि विलासराव या दोघांनाही मुख्यमंत्री केले त्यांनी सुद्धा काँग्रेसशी निष्ठा राखून कायमच पवारांच्या विरोधात राजकारण केले.

    – विलासरावांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने

    2004 च्या निवडणुकीत ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा फक्त दोन आमदार जास्त निवडून आणता आले होते. त्यावेळी खरंतर मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसला दावा करता आला असता, पण काँग्रेसकडे प्रणव मुखर्जी यांच्यासारखे खमके नेतृत्व होते. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला नव्हता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुख्यमंत्रीपद खेचून काँग्रेसकडे घेतले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही दोन-तीन मंत्रीपदे जास्त देऊ, पण मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल, असे प्रणव मुखर्जी मुंबईत येऊन जाहीरपणे म्हणाले होते. त्यानुसारच त्यांनी राजकीय खेळी करून पवारांना काँग्रेसचा मुख्यमंत्री करवून घेणे भाग पाडले होते. प्रणव मुखर्जी शरद पवारांना राजकीय खेळीत भारी पडले. काँग्रेसने 2004 ची निवडणूक सुशील कुमार शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली लढविली होती, पण काँग्रेसने नंतर विलासरावांना मुख्यमंत्री करायचा निर्णय घेतला होता. तो निर्णय काँग्रेसने अंमलात आणला. त्यात शरद पवारांचा वाटा असलाच, तर तो फार थोडा होता. कारण महाराष्ट्रात काँग्रेस त्यावेळी फार बळकट होती आणि केंद्रात काँग्रेसचीच सत्ता होती. त्यामुळे काँग्रेस हायकमांड शरद पवारांचे ऐकून कुठला निर्णय घेण्याची शक्यताच नव्हती. तसा त्यावेळी तो त्यांनी घेतलाही नव्हता.

    त्यामुळे विलासरावांना मुख्यमंत्री करण्याचे श्रेय अजित पवारांनी शरद पवारांना द्यायचा कितीही प्रयत्न केला, तरी ते श्रेय खोटेच होते आणि खोटेच राहिले.

    Sharad Pawar made Vilasrao Deshmukh chief minister, Ajit Pawar gave false credit

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रात निवडणुका महापालिकांच्या; पण पवारांच्या पासून हिजाब पर्यंत पंतप्रधान पदाची चर्चा!!

    रवींद्र चव्हाणांची खेळी पडली तोकडी; अंबरनाथ मध्ये शिंदे सेनेनेच मारली बहुमताची बाजी!!

    BMC Election 2026 : ‘स्पीडब्रेकर’ आघाडी पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाला कायमचे ‘ग्रहण’ लावणार!