• Download App
    Sharad Pawar पवारांच्या राजकारणाची बालेकिल्ल्यात फलश्रुती; नाशिक मध्ये राष्ट्रवादीची भाजप मागे फरफट; पुण्यामध्ये काका - पुतण्यांना काँग्रेसची गरज!!

    पवारांच्या राजकारणाची बालेकिल्ल्यात फलश्रुती; नाशिक मध्ये राष्ट्रवादीची भाजप मागे फरफट; पुण्यामध्ये काका – पुतण्यांना काँग्रेसची गरज!!

    शरद पवारांनी जे आयुष्यभर पुढचे मागचे खालचे वरचे राजकारण केले, त्याची फलश्रुती पवारांच्या राजकारणाच्या बालेकिल्ल्यांमध्येच दिसून आली. नाशिकमध्ये राष्ट्रवादीची भाजप मागे फरफट झाली, तर पुण्यामध्ये काका पुतणे एकत्र येऊन सुद्धा त्यांना काँग्रेसची गरज निर्माण झाली. Sharad Pawar

    – पुणे आणि नाशिक जिल्ह्यांवर वर्चस्व

    शरद पवारांच्या एकूण राजकारणात पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा हे त्यांचे बालेकिल्ले मानले गेले. शरद पवारांनी काँग्रेसमध्ये राहून किंवा काँग्रेस बाहेर पडून जी भूमिका घेतली, त्या भूमिकांना पुणे जिल्ह्यातल्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या नेत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. मतदारांनी सुद्धा त्यांना मोठा कौल दिला. या दोन्ही जिल्ह्यांमधून शरद पवारांच्या पक्षांचे किमान 25 आमदार विधानसभेवर निवडून गेले. आधीच्या समाजवादी काँग्रेस मधून आणि नंतरच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून पवारांनी पुणे आणि नाशिक जिल्ह्यावर वर्चस्व गाजविले होते.

    – सत्तेचा ऑक्सिजन संपला

    राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर सुद्धा पवारांचे ते वर्चस्व शिल्लक राहील, अशी अपेक्षा होती. भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजित पवारांना लाभ होईल, असे मानले जात होते. परंतु, अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचळणीला निघून गेल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तेचा ऑक्सिजन संपला. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत झोपली. भाजपने स्थानिक पातळीवर आपले वर्चस्व वाढविण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी युती केली, पण अजित पवारांना महायुतीतून दूर लोटले.



    – नाशिक मध्ये भाजपमागे फरफट

    त्यामुळेच नाशिक सारख्या शहरात एकेकाळी वर्चस्व गाजविलेले छगन भुजबळ यांच्या राष्ट्रवादीला भाजप मागे फरफट झाल्याचे पाहावे लागले‌. गिरीश महाजन आम्हाला चर्चेसाठी पाच मिनिटे तरी वेळ द्या, अशी विनवणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ, समीर भुजबळ आणि आमदार हिरामण खोसकर यांना करावी लागली. एकेकाळी संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी वर्चस्व गाजविले होते. नाशिक महापालिका, नाशिक जिल्हा परिषद आणि नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पंचायत समित्यांवर त्यांची सत्ता होती, त्यावेळी हे नेते भाजपकडे ढुंकूनही पाहात नव्हते. छगन भुजबळ मफलर अंगावर घेऊन रुबाबात फिरत होते. त्यांचे नेतेही त्यांचेच अनुकरण करत नाशिक जिल्ह्यावर रुबाब करत होते, पण काळ बदलल्याबरोबर भाजपच्या मंत्र्यांच्या गाडीमागे पळायची पवारांच्या नेत्यांवर वेळ आली. आम्हाला महायुती घ्या. तुम्हाला शक्य होतील, तेवढ्या जागा आम्हाला द्या. त्यात जागांवर आम्ही महायुतीतून निवडणूक लढवू, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना कबूल करावे लागले. एवढे होऊन सुद्धा भाजपकडून “शब्द” मिळविण्यात ते अयशस्वी ठरले.

    – पुण्यात दोन्ही पवारांना काँग्रेसची गरज

    दुसरीकडे पुण्यात ज्या काँग्रेसला अजितदादांनी सलग दोन महापालिका निवडणुकांमध्ये हरविले होते, त्याच काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ अजित पवारांच्या वर आणि शरद पवारांच्या वर आली. पुण्यात पवार काका – पुतणे एकत्र येऊन सुद्धा भाजप सारख्या बलाढ्य शक्तीशी टक्कर घेऊ शकत नाही, याची जाणीव दोघांनाही झाली. त्यामुळे अजित पवारांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटलांना फोन करून काँग्रेसशी आघाडी करायची चाचपणी केली. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये सुद्धा याच मुद्द्यावर चर्चा झाली. या चर्चेची माहिती शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांना दिली. स्थानिक गरज आहे म्हणून जिथे शक्य होईल तिथे काँग्रेस सकट सगळ्या पक्षांना बरोबर घ्यायची आमची तयारी आहे. आम्ही सगळ्या पक्षांशी बोलतो आहोत. जे प्रतिसाद देतील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ, असे म्हणायची वेळ शशिकांत शिंदे यांच्यावर आली. याचा अर्थ अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादींची “वेळ” संपुष्टात येत चालली. त्यांची कुठलीच bargaining power उरली नाही, हे महापालिका निवडणुकांपूर्वीच सिद्ध झाले. पवारांच्या राजकीय आयुष्याच्या अखेरीस ही दारुण वस्तुस्थिती समोर आली.

    – बाळासाहेबांची अवस्था दारुण नव्हती

    राजकीय आयुष्याच्या अखेरीस एवढी दारुण अवस्था बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा झाली नव्हती. बाळासाहेब ठाकरे कालवश झाले. त्यावेळी शिवसेना अखंड होती. शिवसेनेचे मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर वगैरे बालेकिल्ले शाबूत होते. शिवसेना तिथे सत्तेवर होती. 2014 च्या निवडणुकीत सुद्धा बाळासाहेबांच्या पुण्याईने शिवसेनेने स्वतंत्र लढून 64 आमदार निवडून आणले होते.

    त्या उलट शरद पवारांच्या राजकीय आयुष्याच्या अखेरीस त्यांचा स्वतःचा पक्ष तर मालवलाच, पण पुतण्याबरोबर तडजोड करायची वेळ आली. एकत्र येऊन सुद्धा ताकद कमी पडते म्हणून बाकीच्या पक्षांच्या नाकदुऱ्या काढायची वेळ त्यांच्या राजकीय वारसदारांवर आली. पवारांच्या बालेकिल्ल्यांमध्येच त्यांच्या राजकारणाची फलश्रुती दिसली.

    Sharad Pawar lost his political clout at the end of his political life

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पुण्यात काँग्रेसला बरोबर घेऊन पवार काका – पुतणे काँग्रेसचे बळ वाढविणार, की काँग्रेसची political space खाऊन टाकणार??

    सुप्रिया सुळेंना भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांचा पुळका; पण स्वतःच्या पक्षात कार्यकर्ते टिकवता येईना!!

    Mumbai BMC Elections : द फोकस एक्सप्लेनर : मुंबईचा ‘किंग’ कोण? महायुतीचा विजयी धडाका विरुद्ध ठाकरेंची अस्तित्वाची लढाई! कुठे कुणाचे पारडे जड? वाचा सविस्तर