नाशिक : राजीव गांधींच्या सरकारने पंचायत राज धोरण अवलंबल्या नंतर काही वर्षांनी काँग्रेसच्या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 % महिला आरक्षण लागू केले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ते धोरण शरद पवारांनी राबविल्याचा मोठा गाजावाजा केला. शरद पवारांची पुरोगामी प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रावर ठसविण्यासाठी महिला धोरणाचे ब्रॅण्डिंग केले. परंतु प्रत्यक्षात घराणेशाहीतल्याच महिलांना मोठमोठ्या पदांवर संधी मिळाली, तरी पवारांच्या पक्ष महिला धोरणाचे ब्रँडिंग करण्यात मागे राहिला नाही. Loopholes in women reservation in baramati
या पार्श्वभूमीवर खुद्द शरद पवारांच्या बारामती तालुक्यातच 50 % महिला आरक्षणाच्या कशा चिंध्या झाल्या, याचा प्रत्यक्ष प्रत्यय शरद पवारांनाच आला. बारामती तालुक्यातल्या डोरलेवाडीत रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या पुनर्बांधणी कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. या डोरलेवाडीत मी कधी मते मागायला आलो नाही, पण तुम्ही मला कधी मत द्यायचे राहिला नाहीत, असे पवारांनी डोरलेवाडीकरांचे कौतूक केले. सगळे पवार समर्थक डोरलेवाडी मध्ये या कार्यक्रमाला जमले होते. पण या कार्यक्रमामध्ये भाषण करण्यासाठी तिथल्या महिला सरपंच पुढे येण्याऐवजी त्या महिलेचा पतीच पुढे आला. त्यावर शरद पवार संतापले. तुम्हाला मागे बसण्यासाठी सरपंच पदाची संधी दिली का?? तुम्ही पुढे येऊन भाषण केले पाहिजे, असे शरद पवारांनी सांगून संबंधित महिला सरपंचाला भाषण करायला लावले.
Maldives : ‘थँक्यू इंडिया’, संकटात सापडलेल्या मालदीवच्या मदतीला भारतच आला धावून
या संदर्भातल्या पवारांच्या पुरोगामीत्वाच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. पवारांनी महिला सरपंचाला कसे प्रोत्साहन दिले, तिच्या पतीला कसे झापले, वगैरे उल्लेख त्या बातम्यांमध्ये आवर्जून केले.
परंतु, मूळात ज्या शरद पवारांनी 50 % महिला आरक्षणाचे धोरण आग्रहाने राबविले, त्यांच्याच बारामती तालुक्यामध्ये महिला सरपंचाला सार्वजनिक कार्यक्रमात मागे का बसावे लागले?? पवारांच्या पक्षाला त्यांनीच राबविल्याचा दावा केलेल्या महिला आरक्षण धोरणासंदर्भातले पुरेसे प्रबोधन पवारांच्या तालुक्यातच का करता आले नाही??, 50 % महिला आरक्षणाचे धोरण आणून आता 25 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला, तरी देखील स्वतंत्रपणे कार्य करणाऱ्या महिला सरपंच पवारांच्या राष्ट्रवादीला तयार करता आल्या नाहीत का??, असे बोचरे सवाल तयार झाले. हे प्रश्न उपस्थित असलेल्या कुणीही थेट पवारांना विचारण्याचा प्रश्नच उद्भवला नाही, पण माध्यमांनी देखील पवारांची भलामण करताना हे प्रश्न उपस्थित केले नाहीत.
Sharad Pawar : Loopholes in women reservation in baramati
महत्वाच्या बातम्या
- PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
- Nitesh Rane : वड्याचे तेल वांग्यावर; राष्ट्रवादीकडून नवाब मलिक प्रकरणाची आगपाखड नितेश राणेंवर!!
- Rameshbhai oza : आपले कार्य उपकार नाही, तर साधना : रमेशभाई ओझा; वनवासी कल्याण आश्रमाचे हरियाणात राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलनाचे उद्घाटन
- Hezbollah : पेजर-वॉकी-टॉकी स्फोटानंतर, हिजबुल्लाच्या गडावर आणखी एक हल्ला