विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar : मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे नेमके कोण आहे??, हे उघड गुपित सगळ्या महाराष्ट्राला माहिती असताना प्रकाश आंबेडकरांनी आज थेट नाव घेऊनच तसा हल्लाबोल केला. शरद पवार हेच मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे आता उघड दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ते ओबीसी आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देतील, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. Sharad Pawar is with Jarange
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर हा आरोप केला आहे. शरद पवार हे जरांगे यांच्याबरोबर आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीला शरद पवार यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यासाठी ते प्रयत्न करतील, असे देखील स्पष्ट झाले आहे. मात्र शरद पवार यांचा हा प्रयत्न विधानसभेच्या निवडणुकीनंतर होईल, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. Sharad Pawar
ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध
ओबीसी आणि मराठा यांच्या आरक्षणाचे ताट वेगळे असावे, अशी स्पष्ट भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली होती. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मागितले आहे. आणि त्याला आमचा पूर्ण विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. राज्यामध्ये 55 लाख मराठ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र इश्यू केले आहेत, ते देखील रद्द करण्यात यावे, अशी आमची मागणी असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. जो कोणी ओबीसी आहे, त्यांनी कागदपत्र दाखल केली, त्यांनी रितसर अर्ज दाखल केला तर त्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकते, असे देखील आंबेडकर यांनी म्हटले आहे. Sharad Pawar
Sharad Pawar is with Jarange
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister War Room : मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
- Manoj Jarange : तिसऱ्या आघाडीत जरांगेंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एंट्री; निवडणुकीनंतरच्या पवारांच्या पुलोद प्रयोगाची नांदी!!
- Jharkhand : झारखंड विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी ; दोन ते तीन टप्प्यात मतदान होणार?
- Nitin Gadkari : ‘…पण आठवले मंत्री नक्की होतील’, नितीन गडकरींनी रामदास आठवलेंना लगावला टोला!