Saturday, 10 May 2025
  • Download App
    तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचा भारत जोडो यात्रेत सहभाग नाही; सुप्रिया सुळेंची माहिती Sharad Pawar is not participating in Bharat Jodo Yatra due to health reasons

    तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचा भारत जोडो यात्रेत सहभाग नाही; सुप्रिया सुळेंची माहिती

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत. शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. शरद पवार यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार या यात्रेत सहभागी होणार नाही पण इतर नेते या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. Sharad Pawar is not participating in Bharat Jodo Yatra due to health reasons

    शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये एडमिट होते. तेथूनच ते शिर्डीत राष्ट्रवादीच्या मंथन मेळाव्याला गेले होते. पण ते स्वतः 5 मिनिटे बोलले. बाकीचे भाषण दिलीप वळसे पाटलांनी वाचून दाखविले.



    राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा तिसरा दिवस आहे. या यात्रेसाठी कॉंग्रेसचे मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसने दिली होती. मात्र पवारांची प्रकृती पूर्णपणे ठीक नसल्याने पवार यामध्ये सहभागी होणार नाही, तर राष्ट्रवादीचे नेते सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उद्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे बुलढाणा आणि हिंगोली येथे रोहित पवार सहभागी होणार आहेत.

    कशी असणार भारत जोडो यात्रा

    राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम, आकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातूल तब्बल १४ दिवस ही यात्रा ३८४ किलोमीटर प्रवास करणार आहे. आज राहुल गांधी नांदेडमध्ये असणार असून तेथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत जोडो यात्रा ३ हजार ५०० किमी प्रवास पूर्ण करणार आहे. तर अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सभेला शिवसेनेकडून आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे.

    Sharad Pawar is not participating in Bharat Jodo Yatra due to health reasons

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस