विशेष प्रतिनिधी
सोलापूर : मराठा आरक्षण (Maratha reservation ) विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद महाराष्ट्रात पेटला असताना मनोज जरांगे आणि शरद पवार यांची छुपी युती एक्सपोज व्हायला लागली. त्यानंतर शरद पवारांनी आपण महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधायला बाहेर पडणार आहोत, अशी भूमिका एबीपी माझा कट्ट्यावर जाहीर केली. मात्र त्यांनी नंतरच्या पत्रकार परिषदेत शिंदे – फडणवीस सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह लावले. मात्र त्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण मनोज जरांगे यांच्या मागणीच्या बाजूने आहोत की विरोधात आहोत??, या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले, त्या ऐवजी ते आपण संवादाची भूमिका घेऊ एवढेच म्हणाले. Sharad Pawar is making loopholes in the issue of Maratha reservation vs. OBC reservation
शरद पवारांच्या या भूमिकेवरच प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला. शरद पवार ओबीसी आरक्षण विरुद्ध मराठा आरक्षण या विषयात पळवाट काढत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. जोपर्यंत पवार थेट भूमिका घेऊन ते मनोज जरांगे यांच्या मागणीच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे सांगणार नाहीत, तोपर्यंत त्यांची भूमिका प्रामाणिक मानता येणार नाही, अशा परखड शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी पवारांच्या भूमिकेचे वाभाडे काढले.
महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना 10 % आरक्षण दिले. परंतु तरी देखील ते नाकारून मनोज जरांगे ओबीसींमधूनच मराठ्यांना आरक्षण खेचून घेण्यासाठी हट्ट धरून बसले आहेत. त्या नेमक्या मुद्द्यावर पवारांनी कुठलेही थेट उत्तर देणे टाळले. म्हणूनच प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार आरक्षण मुद्द्यावर पळवाट काढत असल्याचा आरोप केला आहे.
प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) आरक्षण बचाव यात्रा सोलापुरात पोहोचल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले :
राज ठाकरे महाराष्ट्रात २२५ ते २५० जागा लढवणार आहेत.थँक यू व्हेरी मच, ते २२५ जागा लढवतायत त्याला आम्ही काय करणार??
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार ही पळवाट काढत आहेत. राजकीय पक्ष म्हणून तुम्ही उद्या सत्तेत आलात तर तुम्हाला या स्थितीला उद्या तोंड द्यावे लागेल. तसे असेल, तर मनोज जरांगेंच्या मागणीच्या बाजूने तुम्ही आहात की विरोधात, हे तुम्ही स्पष्ट सांगितले पाहिजे. पवारांसकट सगळे नेते ओबीसींच्या विरोधात आहेत. म्हणून ते पळवाटा काढत आहेत. तुम्ही राजकीय भूमिका घेतल्यावर लोकांना तुमचा मुद्दा कळतो. त्यामुळेच आमच्याबद्दल ना ओबीसी नाराज आहेत, ना मराठे नाराज आहेत.
मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडण देखील फसवे आहे. ओबीसी आरक्षणात मराठ्यांना घुसले नका ही आमची भूमिका आहे. जरांगे ओबीसी समाजाच्या विरोधात आहेत. फडणवीस देखील ठाम भूमिका घेत नाहीत.
Sharad Pawar is making loopholes in the issue of Maratha reservation vs. OBC reservation
महत्वाच्या बातम्या
- Sudhir mungantiwar targets sharad pawar : 7 खासदारांच्या नेत्याला पंतप्रधान सोडा, गृहमंत्री देखील होता येत नाही, तेव्हाच…!
- कुपवाडात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान जखमी, एक शहीद
- आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या, पात्रता काय असावी?
- विधान परिषदेत शेकापचा उमेदवार पडला, मविआतले छोटे पक्ष दुखावले, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा आता स्वबळाचा नारा!!