• Download App
    शरद पवार म्हणजे जपानी बाहुली, प्रत्येकाला वाटतं की ती आपल्यालाच डोळा मारतेय; गडकरींची तुफान फटकेबाजी|Sharad pawar is like Japanese doll, winks to everyone, targets nitin gadkari

    शरद पवार म्हणजे जपानी बाहुली, प्रत्येकाला वाटतं की ती आपल्यालाच डोळा मारतेय; गडकरींची तुफान फटकेबाजी

    प्रतिनिधी

    नागपूर : 2024 च्या लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्यात, तसा राजकीय फड रंगू लागला आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांच्या भाषणानांही रंग चढत आहे. असाच रंग काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणाला नागपूर ग्रामीण मध्ये चढला. त्यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी करत शरद पवारांनाही घेरले.Sharad pawar is like Japanese doll, winks to everyone, targets nitin gadkari

    शरद पवार म्हणजे जपानी बाहुली आहेत. प्रत्येकाला वाटतं की ते आपल्याकडे बघूनच डोळा मारतात, असा टोला गडकरींनी पवारांना हाणत त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा भाजप आणि काँग्रेस नेत्यांना दिला.



    नागपूर ग्रामीण मध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलताना गडकरींनी पवारांच्या राजकारणावर जोरदार निशाणा साधला. एरवी गडकरी सार्वजनिक व्यासपीठावर पवारांविषयी बोलताना त्यांच्या नेतृत्वगुणांची स्तुती करतात. पण कालच्या भाषणात त्यांनी पवारांच्या राजकारणाचे खरे स्वरूपच कार्यकर्त्यांपुढे उघडे केले. शरद पवार म्हणजे जपानी गुडिया आहेत. प्रत्येकाला वाटते साहेब आपल्याकडेच बघून डोळा मारतात, असे गडकरी म्हणाले. याचा अर्थ अप्रत्यक्षपणे पवार कसे सगळे डगरींवर पाय ठेवून असतात आणि नंतर सत्तेकडे झुकतात हेच गडकरींनी सूचित केले.

    जपानी गुडिया जशी प्रत्येकाकडे बघून डोळा मारते, तसे कार्यकर्त्यांना वाटते साहेब आपल्याकडे बघूनच बोलतात, कामाला लागा. पण त्यानंतर मात्र तिकीट भलत्यालाच मिळतं; अशा शब्दांमध्ये गडकऱ्यांनी पवारांवर निशाणा साधला. गडकरींनी या प्रकारे पवारांवर प्रथमच निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. आता गडकऱ्यांच्या या वक्तव्यावर पवारांच्या गोटातून काय उत्तर मिळणार?, येणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    Sharad pawar is like Japanese doll, winks to everyone, targets nitin gadkari

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा