नाशिक : अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवारांनी पार्थ पवार च्या नावाचा आग्रह धरला, अशी बातमी सकाळ समूहाच्या साम टीव्हीने दिली. पण त्यामुळेच कवडीची किंमत वाढली की बाहेरून आलेल्या पवारांची किंमत कमी करण्यासाठी पवारांनी नवी *खेळी” केली??, असा सवाल समोर आला.Sharad Pawar insist Parth pawar’s name for NCP president’s post
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांना न सांगताच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथेविषयी आपल्याला काही माहितीच नव्हते, असा दावा करून शरद पवारांनी कानावर हात ठेवले. त्यावेळी शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात नवा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे बोलले गेले.
– सहयोग सोसायटीमध्ये जाऊन पवारांची चर्चा
पण दोनच दिवसांनी शरद पवार सहयोग सोसायटीमध्ये गेले. तिथे त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याबरोबरच पार्थ आणि जय पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सलग दोन दिवस शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात बैठका सुद्धा झाल्या. विद्या प्रतिष्ठानच्या कामासंबंधी, त्याचबरोबर अजित पवार वेगवेगळ्या संस्थांच्या संचालक मंडळांवर होते त्यांच्या जागेवर कुणाला नेमायचे??, यासंबंधी पवार कुटुंबामध्ये चर्चा झाली. या सगळ्या चर्चा विद्या प्रतिष्ठान किंवा सहयोग सोसायटी मध्ये झाल्या.
– पार्थच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे पिल्लू
मात्र त्याच बैठकांचे रिपोर्टिंग करताना साम टीव्हीने मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे पिल्लू सोडले. शरद पवारांनी म्हणे, पार्थ पवारच्या नावाचा आग्रह धरला. त्यामुळे पार्थ पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होईल, असा दावा साम टीव्हीच्या प्रतिनिधीने केला. पण त्यामुळेच अचानक कवडीची किंमत वाढली की “बाहेरून आलेल्या पवारांची” किंमत कमी करण्यासाठी पवारांनी नवी “खेळी” केली??, असा सवाल समोर आला.
– कवडीची किंमत अचानक कशी वधारली??
ज्या पार्थ पवारच्या नावाचा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आग्रह धरला, त्याच पार्थला काहीच वर्षांपूर्वी त्यांनी कवडीची किंमत दिली नव्हती. पार्थने केवळ राम मंदिराला अनुकूल असणारे ट्विट करून “राजकीय चूक” केली, म्हणून पवारांनी आम्ही पार्थच्या मतांना कवडीची किंमत देत नाही, असे जाहीरपणे सांगून त्याचा अपमान केला होता. पण आता बदललेल्या परिस्थितीत या कवडीची किंमत इतकी वाढली की त्या पार्थचेच नाव आता शरद पवारांनी म्हणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी पुढे केले. पण यातून पवारांनी पार्थची किंमत कवडी पेक्षा जास्त वाढविली, की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री तर मिळाले, पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद मिळू नये, यासाठी नवी “खेळी” केली??, असा सवाल समोर आला. पण या संदर्भातला खुलासा पवारांना कुणी विचारला नाही, त्यामुळे त्या संदर्भात त्यांनी काही सांगितले नाही. पण म्हणून राजकीय सत्य बाहेर यायचे राहिले नाही.
Sharad Pawar insist Parth pawar’s name for NCP president’s post
महत्वाच्या बातम्या
- राज्याच्या औद्योगिक भविष्यासाठी भक्कम पायाभरणी; सर्व एक्सप्रेस वे आणि न्यू टाऊनच्या कामाला गती!!
- मोहब्बत की दुकान खोलून बसलेल्यांना मोदींची कबर खोदायला निघालेत!!, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेतून घणाघात
- Saif al-Islam Gaddafi : लिबियाचे माजी हुकूमशहा गद्दाफींच्या मुलाची हत्या; घरात घुसून गोळी मारली; निवडणूक लढण्याची तयारी करत होते
- Sonam Wangchuk : सुप्रीम कोर्टाने केंद्राला म्हटले-वांगचुक यांच्या जामिनावर विचार करा; त्यांची तब्येत ठीक नाही, तुरुंगात 5 महिने झाले