• Download App
    पवारांच्या तोंडी आमदाराला दमबाजीची भाषा; कलमाडींवर केलेला "तुपे पाटील" प्रयोग शेळकेंवर यशस्वी होण्याची अपेक्षा!! Sharad pawar in a mood of political revenge in maval constituency

    पवारांच्या तोंडी आमदाराला दमबाजीची भाषा; कलमाडींवर केलेला “तुपे पाटील” प्रयोग शेळकेंवर यशस्वी होण्याची अपेक्षा!!

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या तोंडी मावळ विधानसभा मतदारसंघात तिथले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या विषयी दमबाजीची भाषा आली. पवार एकदम “राष्ट्रीय” पातळीवरून मावळात “स्थानिक” पातळीवर उतरले आणि त्यांनी फर्स्ट टाइम आमदार सुनील शेळके यांना दमबाजी केली. Sharad pawar in a mood of political revenge in maval constituency

    एरवी शरद पवार आपण “स्थानिक” राजकारणात लक्ष घालत नाही. आपण “राष्ट्रीय” नेते आहोत, असे नेहमीच म्हणत आले आहेत. मराठी माध्यमांनी देखील त्यांचे ते म्हणणे मनापासून मान्य केले आहे. त्यामुळे शरद पवारांचा उल्लेख मराठी माध्यमे नेहमीच “राष्ट्रीय नेते” म्हणूनच करत आली आहेत.

    पण “राष्ट्रीय नेते” शरद पवारांच्या तोंडी अचानक अशी “स्थानिक” पातळीवर उतरून दमबाजीची भाषाच का आली??, त्यांना फर्स्ट टाइम आमदाराला थेट आपल्या नावाने दम का भरावा लागला??, याचा थोडा धांडोळा घेतला तर काही वेगळ्याच बाबी समोर येत आहेत.

    एक तर पवारांनी भाजपवर केलेला “उद्धव ठाकरे” प्रयोग अडीच वर्षात फसला. त्यानंतर गेले साधारण सहा महिने असले सुरू असलेला “जरांगे प्रयोग” फसत चालला. उलट पवारांच्या या दोन्ही प्रयोगांना भाजपकडून खणखणीत प्रत्युत्तरे मिळाल्यानंतर पवार खऱ्या अर्थाने अडचणीत आले. किंबहुना ते पूर्ण सैरभैर झाले आणि त्यातूनच पवारांच्या तोंडी ही थेट सामान्य आमदाराच्या बाबतीत दमबाजीची भाषा आली.

    पण अशी दमबाजीची भाषा पवारांच्या तोंडी तरी नवीन नाही. 1998 च्या निवडणुकीत पवारांनी असाच “सुनील शेळके प्रयोग” सुरेश कलमाडींवर केला होता. त्यावेळी पुण्यात सुरेश कलमाडींचे पूर्ण वर्चस्व होते. पण ते शरद पवारांपासून अलग झाले होते. पुणे काँग्रेसवर शरद पवारांचे त्या अर्थाने वर्चस्व कधीच नव्हते. बॅरिस्टर गाडगीळांनंतर सुरेश कलमाडींनी पुणे काँग्रेसवर वर्चस्व मिळवले होते. पण पवारांपासून ते पूर्ण बाजूला झाले होते. 1998 च्या निवडणुकीत पवार जरी अखंड काँग्रेसचेच नेते होते, तर सुरेश कलमाडी काँग्रेस पासून दूर जाऊन अपक्ष म्हणून भाजपच्या गोटात शिरले होते. त्याबद्दल कलमाडींना धडा शिकवण्यासाठी पवारांनी पुण्यात “विठ्ठल तुपे पाटील” प्रयोग केला होता.

    1998 च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी काँग्रेस पासून दूर जाऊन अपक्ष म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर उभे राहिले होते. आपण निश्चित निवडून येणार याची त्यांना खात्री होती. कारण त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या तोफा सुरेश कलमाडींच्या बाजूने धडाडल्या होत्या. पण बाळासाहेबांनी सुरेश कलमाडींचा उल्लेख ऐनवेळी “बेडूक” असा केला आणि निवडणूक फिरली.


    Sharad Pawar : 124 ए राजद्रोहाचे कलम रद्द करण्यासाठी राज्यसभेत बोलू!!; प्रकाश आंबेडकरांविषयीचा प्रश्न टाळला!!


    त्याचवेळी पवारांनी त्यावेळी सुप्तपणे विठ्ठल तुपे यांचा प्रचार “तुपे पाटलांना” मतदान करा, असा केला होता. हाच पवारांचा सुरेश कलमाडींवर “तुपे पाटील” प्रयोग होता. पवारांनी “तुपे पाटील” असा प्रचार करून पुणे शहरात मराठा मतांचे ध्रुवीकरण घडवून आणले होते. पवारांचा हा प्रयोग साधारण वर्षभरच टिकू शकला. कारण विठ्ठल तुपे पाटलांची खासदारकी फक्त 13 महिने टिकली होती. त्यानंतर ते 1999 च्या लोकसभा निवडणुकीत विठ्ठल तुपे पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन ते राष्ट्रवादीचे उमेदवार बनले होते.

    1998 मधली पुण्यातली परिस्थिती आणि 2024 मधली मावळ मधली परिस्थिती यात समानता आहे. सुरेश कलमाडींना पवारांनीच राजकारणात आणले होते, पण ते पवारांपासून दूर गेल्यानंतर त्यांनी एका निवडणुकीपुरता कलमाडींना धडा शिकवला होता. आता मावळात सुनील शेळके यांना तसाच धडा शिकवण्याचा पवारांचा मनसूबा आहे.

    मावळ मतदार संघात पवारांनीच उभे केलेले आमदार सुनील शेळके पवारांच्याच अखंड राष्ट्रवादी काँग्रेस मधून घड्याळाच्या तिकिटावर निवडून गेले. राजकीय फोडाफोडीत त्यांनी अजित पवारांचा मार्ग धरला. इतकेच नाही, तर त्यांनी मावळातले ज्येष्ठ नेते मदन बाफना यांच्यावर प्रत्युत्तर देखील टीका केली. आपलेच जुने सहकारी मदन बाफना यांच्यावर टीका केल्यामुळे पवार चिडले आणि त्यांनी थेट सुनील शेळकेंवर “विठ्ठल तुपे पाटील” प्रयोग सुरू केला. त्यातूनच आपले नाव शरद पवार आहे, अशी दमबाजी पवारांनी केली.

    हा प्रयोग त्यांनी आधी सुरेश कलमाडींवर केला होता, आता ते सुनील शेळकेंवर करत आहेत. कलमाडींवरचा “तुपे पाटील प्रयोग” फक्त 13 महिन्यांपर्यंत टिकला होता. बदललेल्या परिस्थितीत सुनील शेळकेंवरचा प्रयोग यशस्वी होईल का आणि यशस्वी झाला, तर तो कितपत टिकेल??, याविषयी दाट शंका आहे.

    Sharad pawar in a mood of political revenge in maval constituency

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस