• Download App
    Sharad pawar Z प्लस सुरक्षेवरून पवारांचे केंद्र सरकारवर संशयाचे जाळे

    Sharad Pawar : Z प्लस सुरक्षेवरून पवारांचे केंद्र सरकारवर संशयाचे जाळे, पण विद्यार्थी आंदोलनात घुसून तेच संशयाच्या जाळ्यात अडकले!!

     

    नाशिक : केंद्र सरकारने शरद पवारांना Z प्लस सिक्युरिटी दिली. मात्र ती सिक्युरिटी स्वीकारताना शरद पवारांनी अशी काही “गुगली” टाकली, की त्यामुळे केंद्र सरकारवरच संशयाचे जाळे पडले. पण प्रत्यक्षात एमपीएससी विद्यार्थी आंदोलनात “घुसून” शरद पवार स्वतःच संशयाच्या जाळ्यात अडकले. Sharad pawar himself in the net of doubt in MPSC agitation

    केंद्रीय गृह मंत्रालयाने काही गुप्तचर अहवालांच्या आधारे विविध नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्य काही निवडक नेत्यांना “झेड प्लस” सिक्युरिटीची गरज असल्याचे लक्षात आले. त्यामुळे सगळ्यांना झेड प्लस सिक्युरिटी पुरविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला. ज्यांना “झेड प्लस” सिक्युरिटी मिळाली, त्यासंदर्भात किरकोळ स्वरूपाच्या बातम्या आल्या.

    पण स्वतः शरद पवारांनी मात्र या संदर्भात चमकोगिरी करत माध्यमांना वेगळीच प्रतिक्रिया दिल्याने त्यांच्या बातम्या मोठ्या आल्या. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ आल्याने माझ्या दौऱ्यांची ऑथेंटिक माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने कदाचित मला “झेड प्लस” सिक्युरिटी दिली असावी, असे वक्तव्य शरद पवारांनी करून केंद्र सरकारवर संशयाचे जाळे फेकले. त्यामुळे “शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी विषयी संशय”, “पवारांनी “गुगली” टाकली” वगैरे बातम्या मराठी प्रसार माध्यमांनी दिल्या.



    एमपीएससी विद्यार्थी आंदोलन

    पण त्या पलीकडे जाऊन एमपीएससी विद्यार्थी आंदोलनात “घुसखोरी” करून पवारांनी स्वतःभोवतीच संशयाचे मोठे जाळे निर्माण करून ठेवले. एमपीएससी पूर्व परीक्षा आणि आयबीपीएस परीक्षा यांच्या तारखा क्लॅश झाल्यामुळे पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेऊन शिंदे – फडणवीस सरकारने एमपीएससीला एमपीएससी बोर्डाला सूचना करून एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलायला लावली. त्याप्रमाणे एमपीएससी बोर्डाने परीक्षा पुढे ढकलण्याची सूचना देखील काढली. परंतु एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात पेटवापेटवी व्हावी या हेतूने आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि नंतर स्वतः शरद पवार या आंदोलनात “घुसले”. या तिन्ही नेत्यांनी आंदोलन स्थळी जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आपण सामील झाल्याचे दाखविले. प्रत्यक्षात शिंदे – फडणवीस सरकारच्या सूचनेनंतर एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली गेली. त्यामुळे तो विषय तिथे थांबायला हवा होता.

    पण प्रत्यक्षात आज रोहित पवारांच्या पुढाकाराने एमपीएससीचे काही आंदोलक विद्यार्थी शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या “1 मोदी बाग” या निवासस्थानी गेले. शरद पवारांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

    पवारांचे “मार्गदर्शन” कोणते??

    शरद पवारांनी काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात “मणिपूर” घडण्याचे राजकीय भाकित वर्तवले होते. त्या पाठोपाठ आमदार रोहित पवारांनी देखील याच एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात “बांगलादेश” घडविण्याची भाषा वापरली होती. या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली गेल्यानंतर तो विषय मिटण्याऐवजी एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. त्यासाठी रोहित पवारांनी पुढाकार घेतला. यातून शरद पवारांच्या भोवतीच संशयाचे दाट जाळे निर्माण झाले. शरद पवार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी त्यांच्या भवितव्याबद्दल बोलले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या बातम्या सगळीकडे आल्या. परंतु पवारांचे विद्यार्थ्यांना “मार्गदर्शन” नेमके कसले होते??, त्याचे परिणाम महाराष्ट्रात केव्हा आणि कसे दिसणार??, याविषयी संशयाचे मळभ पसरले आहे.

    Sharad pawar himself in the net of doubt in MPSC agitation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!