• Download App
    Sharad Pawar has become a toy in the hands of BJP ठाकरेंना सोडून पवार शिंदेंच्या पुठ्ठ्यात शिरले

    ठाकरेंना सोडून पवार शिंदेंच्या पुठ्ठ्यात शिरले; माध्यमनिर्मित चाणक्याचे “नवे डाव” सुरू झाले, पण भाजपच्याच हातातले “खेळणे” बनले!!

    Sharad Pawar

    ठाकरेंना सोडून पवार शिंदेंच्या पुठ्ठ्यात शिरले; माध्यमनिर्मित चाणक्याचे “नवे डाव” सुरू झाले, पण अखेर ते भाजपच्याच हातातले “खेळणे” बनले!!, हे सत्य स्वीकारायची वेळ शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून आणली.Sharad Pawar has become a toy in the hands of BJP

    बरेच दिवस माध्यमांच्या बातम्यांमधून बाहेर राहावे लागल्यानंतर शरद पवार दिल्लीतल्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष नात्याने व्यासपीठावर पुन्हा आले. एकनाथ शिंदेंना त्यांनी शिंदेशाही पगडी घालून महादजी शिंदे पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. सत्काराच्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती जपण्याच्या नावाखाली एकनाथ शिंदे यांची अफाट स्तुती केली. एकनाथ शिंदेंनी ठाण्याचे राजकारण योग्य मार्गाला नेले, अशी प्रशंसा केली. एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातल्या तथाकथित मतभेदांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी ही “खेळी” केली पण या खेळीत ठाकरे गट “आऊट” झाला. पवारांनी बाण सोडला होता भाजपच्या दिशेने, पण तो गेला ठाकरे गटाच्या दिशेने!!



    एकनाथ शिंदे यांच्या सत्काराच्या निमित्ताने पवार शिंदेंच्या पुठ्ठ्यात शिरले. उद्धव ठाकरेंना त्यांनी सोडून दिले. असाच डाव त्यांनी 2014 मध्ये वेगळ्या पद्धतीने खेळला होता. त्यावेळी त्यांना ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये पाचर मारायची होती म्हणून त्यांनी ठाकरेंना बाजूला करून भाजपला परस्पर पाठिंबा देऊन टाकला होता. हे त्यांनी उघडपणे मुलाखतीत सांगितले होते.

    त्याउलट 2019 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना जवळ केले. त्यांना भाजपपासून फोडण्यासाठी फूस लावली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे हक्काचे आणि जनतेने कौल दिलेले मुख्यमंत्रीपद त्यांच्यापासून हिरावले गेले. ते उद्धव ठाकरेंना आयते मिळाले. पण या सगळ्यांमध्ये पवारांच्या राजकारणाची पोळी पिकली, पण पवारांच्या दुर्दैवाने ती अडीच वर्षे टिकली. उलट २०२२ मध्ये सगळाच “डाव” उलटला. ठाकरे आणि पवारांचे पक्ष फुटले. फुटलेले दोन्ही पक्ष भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तर ठाकरे आणि पवार या दोन्ही नेत्यांच्या पक्षांचा सुपडा साप झाला. माध्यमनिर्मित चाणक्यांनी कुठल्या डाव टाकावा अशी आमदारांची संख्याच त्यांच्या हाताशी उरली नाही म्हणून पवारांना कुठलाच “डाव” टाकता आला नाही.

    अजित पवारांना इच्छेने किंवा अनिच्छेने पवारांनी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठविले. त्यातून पवारांच्या अनुयायांची सत्तेची पोळी पिकली. ती भाजपने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पिकू दिली. या दरम्यान ठाकरेंचा पवारांच्या राजकारणासाठी काही उपयोग शिल्लक उरला नाही म्हणून मग साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पवारांनी वेगळा डाव टाकायला सुरुवात केली. ठाकरेंना सोडून ते शिंदेंच्या पुठ्ठ्यात शिरायला लागले. शिंदे आणि भाजप यांच्यातल्या तथाकथित मतभेदांचा फायदा काही उपटता येतोय का?? हे राजकारण माध्यमनिर्मित चाणक्यांच्या डोक्यात शिजायला लागले. त्यातूनच महादजी शिंदे पुरस्काराची टूम निघाली. तो एकनाथ शिंदे यांना देण्याची सूचना पुढे आली. यातून पवारांनी पुन्हा माध्यमांच्या चर्चेत येण्याचे राजकारण साधून घेतले. पण हे सगळे करताना आणि घडताना पवार भाजपच्याच हातातले खेळणे बनले. कारण मूळ राजकीय खेळ तर भाजपने केला. शिंदेंना आपल्याला हवे तेव्हा मुख्यमंत्री केले, आपल्याला नको तेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री केले. शिंदेंनी पवारांच्या हस्ते शिंदेशाही पगडी डोक्यावर घालून घेतली. पण भाषणात पवार आपल्याला गुगली टाकणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करून देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह आपण चांगले सरकार चालवत असल्याचा निर्वाळा दिला.

    संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे चिडचिड करून यावेळी पहिल्यांदा पवारांवर निशाणा साधला. साहित्य संमेलनातले दलाली बाहेर काढली ती जरी खरी असली, तरी फक्त स्वतःच्या सोयीच्या वेळेत ती बाहेर काढल्याने संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर कोणाचा विश्वास बसला नाही. अन्यथा मराठी साहित्य संमेलनात दलाली चालते‌ आणि पवार कुठूनही त्यामध्ये शिरकाव करून साहित्य संमेलनाचे उद्घाटक किंवा स्वागताध्यक्ष बनतात हे सत्य महाराष्ट्र कित्येक वर्षांपासून पाहात आहे. त्यात पवारांचे साहित्यिक योगदान नेमके किती??, हा प्रश्न महाराष्ट्रात कुणी विचारायच्या फंदात पडले नाही. पण म्हणून माध्यम निर्मित चाणक्याचे नवे डाव उघड्यावर यायचे राहिले नाहीत.

    पवारांचा हा नवा डावा ओळखूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची खिल्ली उडवली. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा उत्कृष्ट मुख्यमंत्री होते, हे पवार साहेबांना समजायला उशीर झाला असा टोला बावनकुळे यांनी हाणला. पवारांनी केलेला शिंदेंचा सत्कार त्यामुळे ठाकरे गटाची झालेली चिडचिड याचा “आनंद” भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतला!!

    Sharad Pawar has become a toy in the hands of BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस