विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढण्यापासून माघार घेण्याच्या निर्णयाने शरद पवार खुश झाले. त्यांनी योग्य निर्णय घेतला. त्यामुळे बरे झाले, असे पवार म्हणाले.
मनोज जरांगे यांनी मोक्याच्या क्षणी निवडणूक लढण्यापासून माघार घेतली. त्याऐवजी तुम्हाला पाडायचे ते उमेदवार पाडा, असे सांगून भाजपच आपला शत्रू असल्याचे निर्देशित केले. जरांगे यांच्या या वक्तव्यावर शरद पवार खुश झाले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला.
मनोज जरांगे यांनी उमेदवार दिले असते, तर मत विभागणीचा भाजपलाच फायदा झाला असता. आता ते उमेदवार देत नसल्यामुळे मत विभागणी होणार नाही आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल. कारण त्यांनीच जाहीर केल्याप्रमाणे भाजप त्यांचा शत्रू आहे, असे पवार म्हणाले.
मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि त्यांचा माघारीचा निर्णय या पार्श्वभूमीवर पवारांच्या तोंडून प्रथमच जरांगे आणि महाविकास आघाडी यांच्यातले राजकीय साटे लोटे बाहेर आले.
Pawar happy with Jarange’s decision to withdraw
महत्वाच्या बातम्या
- RPI Athwale group सतत डावलले जात असल्याने रिपाइं (आठवले गट) नाराज, महायुतीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका
- Uddhav Thackeray group उध्दव ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध आहे का? मनसेचा घणाघात
- Jammu and Kashmir’ : जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवादी हल्ला; यूपीतील 2 तरुणांवर गोळीबार; 12 दिवसांपूर्वी 7 जणांची हत्या
- Pakistan : पाकिस्तानमध्ये झालेल्या स्फोटात 7 ठार, 23 जखमी; मृतांमध्ये 5 मुले आणि पोलिसांचा समावेश