नाशिक : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या युतीने 16 पैकी 12 जागा जिंकून बाजी मारली. “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी त्या विषयाचे वर्णन पवार – शेलार युतीचा बंपर फायदा, अशा शब्दांनी केले त्यामुळेच पवार – शेलार युतीचा बंपर फायदा; पण पवार अजून किती “खाली” उतरणार??, असा सवाल समोर आला.Sharad Pawar had to compromise with Devendra fadnavis and Ashish shelar for MCA politics
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यावर एकेकाळी शरद पवारांचे एकहाती वर्चस्व होते. ते म्हणतील ती पूर्व अशी काही वर्षांपूर्वी स्थिती होती. पण आता ती स्थिती उरली नाही शरद पवारांना सगळ्या क्रिकेट मंडळांवर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपच्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या नेत्यांची मदत घ्यावी लागते हे राजकीय सत्य मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी तळजोड केली. त्यामुळेच अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर फेरनिवड बिनविरोध झाली. त्यानंतर उरलेल्या पदांसाठी निवडणुका झाल्या. त्यामध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या युतीच्या 12 उमेदवारांचा विजय झाला. म्हणून “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी पवार – शेलार युतीचा बंपर फायदा झाल्याचे ढोल पिटले. पण पवारांना ही निवडणूक आपल्या मनासारखी घडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तडजोड करावी लागली. त्यांच्यापेक्षा खालच्या फळीतले नेते आशिष शेलार यांच्याशी युती करावी लागली. हे सत्य मात्र मराठी माध्यमांनी सांगितले नाही.
– पवार दाखवतात वेगळे
एरवी शरद पवार आपला केंद्रीय राजकारणामध्ये किती प्रभाव आहे हे दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवळीक असल्याचे सांगत असत. त्यासाठी अधून मधून त्यांच्या भेटीगाठी घेत असत. आपण महाराष्ट्रातले प्रश्न थेट केंद्रीय नेतृत्वाशी सोडू बोलूनच सोडवतो. त्यासाठी आपल्याला “खाली” कोणाशी बोलावे लागत नाही, असे ते वारंवार दाखवून देत असत. काँग्रेस बरोबर कुठलीही राजकीय चर्चा आणि वाटाघाटी करताना शरद पवारांनी नेहमीच काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांची जवळीक ठेवली. त्यांनी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना कधीच फारशी किंमत दिली नाही.
– मराठी माध्यमांना न पचलेले सत्य
पण आता मात्र शरद पवारांना खेळातल्या राजकारणात आपले स्थान टिकवण्यासाठी भाजपच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांशी म्हणजे देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करावी लागली. वाटाघाटी कराव्या लागल्या आणि त्यापलीकडे जाऊन फडणवीसांपेक्षाही खालच्या स्तरावरच्या आशिष शेलार यांच्याशी युती करावी लागली. हे राजकीय सत्य मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले. फक्त ते मराठी माध्यमांना पचले नाही म्हणून त्यांनी ते सांगितले नाही.
– पवार जिल्हा स्तरावरही उतरणार??
पण त्यामुळेच वर उल्लेख केलेला सवाल समोर आला. आता शरद पवारांच्या एकहाती सत्तेत भाजपने वेगवेगळ्या ठिकाणी पाचर मारून ठेवलीच आहे. त्यामुळे यापुढे पवारांना भाजपच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांशीच वाटाघाटी आणि चर्चा कराव्या लागणार आहेत. तरच त्यांना हवे असलेले राजकारण ते खेळांमध्ये चालवू शकतील अन्यथा त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना निवडणुकीच्या मैदानातही उतरावे लागेल आणि तिथे भाजपच्या प्रदेश पातळीच्या नेत्यांशी त्यांना टक्कर घ्यावी लागेल. पण या सगळ्या एकूण राजकारणात शरद पवारांना भरपूर “खालच्या” स्तरावर उतरावे लागले. त्यांचा केंद्रीय राजकारणाचा तोरा उतरवून ठेवावा लागला. आता इथून पुढे पवारांनी भाजपच्या एखाद्या जिल्हा स्तरावरच्या नेत्या बरोबर त्यांनी चर्चा किंवा वाटाघाटी केल्या, तर आश्चर्य वाटायला नको. पण हे सत्य मराठी माध्यमांना पचणार नाही त्यामुळे ते सत्य मराठी माध्यमे सांगणार नाहीत.
Sharad Pawar had to compromise with Devendra fadnavis and Ashish shelar for MCA politics
महत्वाच्या बातम्या
- सरकारने दिल्ली ब्लास्टला दहशतवादी घटना मानले; टेरर कनेक्शनमधील दुसरी संशयित कार फरिदाबादेत सापडली
- सुनावणीची बतावणी, उद्धव सेनेकडून सुप्रीम कोर्टाची खिल्ली!!
- White Collar Terror : व्हाइट कॉलर टेरर मोड्युलने दिल्ली हादरवण्याचा कट; 3 डॉक्टरांच्या अटकेनंतर अल-फलाह विद्यापीठ चौकशीच्या फेऱ्यात
- Nithari : निठारी हत्याकांडातील मुख्य दोषी सुरेंद्र कोलीची सुटका होणार; सुप्रीम कोर्टाने शेवटच्या प्रकरणातही निर्दोष सोडले