विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शरद पवार यांनी दाखल केलेली याचिका शुक्रवारी (दि. 16) सर्वोच्च न्यायालयासमोर मेन्शन करण्यात आली. त्यावेळी शरद पवार गटाचे वकील अभिषेक सिंघवी यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र, लवकरच सुनावणीची तारीख दिली जाईल, असे न्यायालयाने सांगितले. Sharad Pawar group’s demand to the Supreme Court
आयोगाने 6 फेब्रुवारीला अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय देऊन घड्याळ हे पक्षाचे अधिकृत चिन्हही त्यांना बहाल केले. आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला अमित शाहांच्या भेटीसाठी
या याचिकेशी संबंधित काही त्रुटी दूर केल्यानंतर शुक्रवारी ती न्यायालयासमोर आली. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी, १९ फेब्रुवारीलाच घ्यावी, अशी मागणी सिंघवी यांनी केली. २० तारखेला विशेष अधिवेशन आणि २६ तारखेपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार गटाकडून शरद पवार गटाविरुद्ध व्हीपचा वापर होऊ शकतो, त्यामुळे तातडीने सुनावणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
सरन्यायाधीशांनी त्यांना लवकरच पुढची तारीख देऊ, असे सांगितले. त्यामुळे कदाचित शनिवारी (दि. 17) शरद पवार गटाला पुढच्या आठवड्यातील तारीख दिली जाऊ शकते. मात्र, ही सुनावणी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार की अन्य खंडपीठाकडे दिली जाणार हे स्पष्ट झालेले नाही.
Sharad Pawar group’s demand to the Supreme Court
महत्वाच्या बातम्या
- हातात दगड, पण सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी सहमत; लेखी हमी मागितली!!
- दिल्ली – चिपळूण – नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर विरोधक दगड घेऊन रस्त्यावर!!
- मणिपुरात एसपी कार्यालयात तोडफोड; वाहने जाळली, तिरंग्याचा अवमान, दोन जण ठार
- पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमीरांना भारत भेटीचे निमंत्रण दिले, 8 भारतीयांच्या सुटकेवर म्हणाले…