• Download App
    Amol Mitkari अमोल मिटकरींना शरद पवार गटाची ऑफर,

    Amol Mitkari : अमोल मिटकरींना शरद पवार गटाची ऑफर, म्हणाले- अजितदादांची साथ मरेपर्यंत सोडणार नाही

    Amol Mitkari

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Amol Mitkari राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असलेले आमदार अमोल मिटकरी  ( Amol Mitkari ) यांना शरद पवार गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. शरद पवारांच्या पक्षातील एका बड्या नेत्याने ही ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे. तर या वृत्ताला स्वतः अमोल मिटकरी यांनी दुजोरा दिला आहे. पक्षप्रवेशाच्या ऑफरबाबत बोलतांना मिटकरी म्हणाले की, मला माझ्या पक्षात कुठलीही अडचण नसून माझ्यासारख्या छोट्या माणसाला या पक्षाने खूप काही दिले आहे. तसेही, अजितदादांसमोर मला सर्व ऑफर या शून्य आहेत. तसेच, मरेपर्यंत मी अजित पवारांची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.Amol Mitkari



    अजितदादांसमोर सर्व ऑफर शून्य- मिटकरी

    अमोल मिटकरी यांना प्रसार माध्यमांनी शरद पवार गटाच्या ऑफरबाबत विचारले असता मिटकरी म्हणाले की, याबाबत तथ्य आहे. पण काही जणांशी सौजन्याचे नाते असल्यामुळं काही गोष्टी बोलता येत नाही. याबाबत मी आमच्या सर्व नेत्यांना कळवल्याचेही त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी माझ्यासारख्या छोट्या समुहातील, सामान्य कुटुंबातील व्यक्तीला मोठे पद दिले आहे. त्यामुळे त्या नेत्याच्या विचाराशी मी कधीही प्रतारणा करणार नाही. अजितदादा यांच्यासमोर सर्व ऑफर शून्य आहेत. अजितदादांकडे बघूनच आम्ही पक्षात आलो आहोत. आमच्या पुढच्या सात पिढ्यादेखील अजितदादांच्या उपकारातून मुक्त होऊ शकत नाही. आमदार अमोल मिटकरींनी शरद पवार गटाची ऑफर विनम्रपणे नाकारली आहे. आपल्या सात पिढ्या अजित पवारांच्या ऋणातून उतराई होणार नसल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.

    मरेपर्यंत अजित पवारांची साथ सोडणार नाही- मिटकरी

    मिटकरी म्हणाले की, शरद पवार गटातील सबंधित मोठ्या नेत्याला मी सांगितलं होतं की, मला माझ्या पक्षापेक्षा दुसरा कोणताही पक्ष मोठा नाही. तसेच, माझ्या नेत्यापेक्षा दुसरा कोणताच नेता मला मोठा नाही आणि तो नेता म्हणजे अजितदादा पवार. मी मरेपर्यंत अजित पवार यांची साथ सोडणार नसल्याचेही मिटकरी यांनी यावेळी सांगितले.

    Sharad Pawar group offer to Amol Mitkari, said – will not leave Ajitdad’s support till death

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!