विशेष प्रतिनिधी
पुणे : ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटातं, हे शरद पवारांच्या पक्षाचे स्वरूप राहिले आहे. पवारांनी कुठल्याही पक्ष स्थापन करू देत, त्यांनी आपल्या पक्षाचे भरण पोषण काँग्रेसचेच नेते आपल्या पक्षात खेचून केले. आता याचेच प्रत्यंतल माढा मतदारसंघात येत आहे. माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पवारांना दुसरा कुठलाही नवा उमेदवार सापडला नाही म्हणून त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांचा घरातील धैर्यशील मोहिते पाटील यांना हाताशी धरून त्यांना आपल्या पक्षात घेऊन माढातून उमेदवारी देण्याची चाचपणी केली आहे. Sharad pawar gets no new candidate in madha loksabha constituency, pitching for old guards mohite patil
धैर्यशील मोहिते पाटील 13 एप्रिलला अकलूज मधल्या एका कार्यक्रमात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. मोहिते पाटलांच्या निकटवर्ती यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेऊन त्या कार्यक्रमाची तपशीलवार आखणी केली. त्यानुसार 13 एप्रिलला अकलूज मधल्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात मोठा मेळावा आयोजित करून त्या मेळाव्यात धैर्यशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले असून तशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.
विजयसिंह मोहिते पाटलांचे चिरंजीव रणजीत सिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेश झाला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोहिते पाटलांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता असे त्या बातम्यांमध्ये नमूद केले होते पण यापैकी नेमके खरे काय??, हे कुठल्याच माध्यमातून सांगता आलेले नव्हते.
ते काहीही असली तरी माढा लोकसभा मतदारसंघात रणजीत सिंह निंबाळकर यांना टक्कर देण्यासाठी पवारांना नव्या दमाचा कोणताही वेगळा तरुण आढळला नाही हेच त्यांच्या खेळीवरून दिसून येते. विजयसिंह मोहिते पाटील हे आधीपासूनच पवारांचे समर्थक होतेच. ते पवारांच्या मंत्रिमंडळात कित्येक वर्षे मंत्री होते. शरद पवारांनंतर 2009 मध्ये ते माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. परंतु 2014 नंतर देशात मोदी लाट आली त्यानंतर मात्र मोहिते पाटलांचा होरा बदलला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपने त्यांचा मुलगा रणजीत सिंह मोहिते पाटील यांना आमदार केले, तेव्हापासून मोहिते पाटील भाजपशी संलग्न होते. परंतु आता धैर्यशील मोहिते पाटलांची राजकीय महत्त्वाकांक्षा फुलली. त्यांनी रणजीत सिंह निंबाळकर यांना बाजूला करून आपल्यालाच माढातून उमेदवारी मिळावी, असा भाजपकडे आग्रह धरला होता. परंतु भाजपने रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्याच पारड्यात वजन टाकले त्यामुळे मोहिते पाटलांना दुसरा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यातूनच मोहिते पाटलांनी आपला जुनाच राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग निवडला.
त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात रणजीत सिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते अशी टक्कर पाहायला मिळणार आहे. रणजीत सिंह निंबाळकर यांच्या विरोधात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयमामा शिंदे उतरले होते. तेच संजयमामा शिंदे रणजीत सिंह निंबाळकर यांच्या बाजूने प्रचारात उतरले आहेत. कारण त्यांना भाजपने आमदारकीसाठी मदत केली आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांनी घरी शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तरी ते माळशिरस मधला आपला मर्यादित प्रभाव संपूर्ण माढा मतदारसंघात कसा पसरवू शकतात, यावर त्यांच्या यशाचे गणित अवलंबून आहे.
Sharad pawar gets no new candidate in madha loksabha constituency, pitching for old guards mohite patil
महत्वाच्या बातम्या
- मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरे महाराष्ट्रात बनलेत त्यांचा “रिझर्व्ह फोर्स”!!
- राज ठाकरेंचा मोदींना बिनशर्त पाठिंबा; पण महाराष्ट्र विधानसभा ताकदीने लढवायला मनसेचे इंजिन “मोकळे”!!
- केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी तिसरी याचिका दाखल; 10 एप्रिलला सुनावणी
- गौरव वल्लभ यांची जयराम रमेशांवर टीका, म्हणाले- त्यांना फक्त राज्यसभेची चिंता, अनुभव नसूनही काँग्रेसचा जाहीरनामा लिहितात