विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने कायदा आणि नियमानुसार अजित पवार गटाकडे सोपवल्यानंतर शरद पवार गटाला आज दुपारी 4.00 वाजेपर्यंत नवे चिन्ह आणि पक्षाचे नवे नाव स्वीकारायचे आहे. नवे नाव स्वीकारताना शरद पवार गटाने “शरद”, “काँग्रेस” आणि “स्वाभिमान” या 3 कॉमन फॅक्टर्स वर विचार करून निवडणूक आयोगाला नावे सुचविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे शरद पवार गटाने “शरद पवार काँग्रेस”, “मी राष्ट्रवादी” आणि “शरद स्वाभिमानी पक्ष” अशी 3 नावे सुचविल्याचे समोर आले आहे.Sharad pawar faction suggests few more names for his political party
निवडणूक आयोगाने शरद पवार यांना सांगितले आहे की, ते त्यांचा नवा पक्ष स्थापन करण्यासाठी आयोगाला कोणतीही 4 नावे देऊ शकतात. त्यासाठी आयोगाने शरद पवार गटाला आज बुधवारी दुपारी 4.00 वाजेपर्यंत मुदत दिली आहे. शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या पण अन् चिन्हांनी नाव समोर आली आहेत.
पक्षाचे नाव-
शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि शरद स्वाभिमानी पक्ष
चिन्ह-
कपबशी, सूर्यफूल, चष्मा आणि उगवता सूर्य
शरद पवार यांची राजकीय नाळ काँग्रेसी विचारधारेशीच जुळते. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाबरोबर जरी त्यांचे पटत नसले, तरी पक्षाच्या नावातून काँग्रेस शब्द हटविणे त्यांना राजकीय दृष्ट्या परवडणारे नाही. म्हणूनच “शरद पवार काँग्रेस” हे नाव सुचविले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांचेच राजकीय अपत्य होते आणि स्वाभिमानाच्या मुद्द्यावर त्यांनी तो पक्ष स्थापन केला होता त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून “मी राष्ट्रवादी” आणि तिसरा पर्याय म्हणून “स्वाभिमानी राष्ट्रवादी पक्ष” अशी नावे शरद पवार गटाने सुचविली आहेत.
आनंदाचा उन्माद टाळा
दरम्यान पक्ष-चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. देवगिरीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत अजित पवारांनी ह्या सूचना दिल्या आहेत. आपल्याला जनमताच्या आधारावर पक्ष-चिन्ह मिळाले, त्याचा मान राखा, असे अजित पवार म्हणाले. जाहीरपणे बोलताना वाद होईल, अशी वक्तव्ये टाळा, पक्ष-चिन्ह मिळाल्याचा आनंद असला तरी उन्माद होऊ देऊ नका. यापुढे अधिकाधिक लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील, यासाठी जोमाने कामाला लागा, असे अजित पवार म्हणाले.
Sharad pawar faction suggests few more names for his political party
महत्वाच्या बातम्या
- दमलेल्या काकाची कहाणी
- NCP : सुप्रिया सुळे या “वाय. एस. शर्मिला” का होऊ शकत नाहीत??
- NCP : “मी राष्ट्रवादी पार्टी” किंवा “स्वाभिमानी राष्ट्रवादी”, “उगवता सूर्य”; पक्षाचे नवे नाव आणि चिन्हावर शरद पवार गटात खलबते!!
- NCP : निवडणूक आयोगाच्या निकालावर पवारांची “ताजी” प्रतिक्रिया नाही; थकणारही नाही, थांबणारही नाही, हा जुनाच व्हिडिओ व्हायरल!!