• Download App
    राष्ट्रवादीतल्या नाट्यावर पडदा नाही पडला, पवारांनी सवयीप्रमाणे शब्द फिरवला!!; विखे पाटलांची खोचक टीका|Sharad Pawar did get u turn as usual, targets radhakrishna vikhe patil

    राष्ट्रवादीतल्या नाट्यावर पडदा नाही पडला, पवारांनी सवयीप्रमाणे शब्द फिरवला!!; विखे पाटलांची खोचक टीका

    प्रतिनिधी

    अहमदनगर : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आणि या राजीनामा नाट्यावर पडदा पडला. शरद पवार यांच्या निवृत्ती नाट्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. पवारांनी भाकरी नव्हे, नेहमीच्या सवयीप्रमाणे आपला शब्द फिरवला, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.Sharad Pawar did get u turn as usual, targets radhakrishna vikhe patil



    शरद पवार यांनी 2 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी लावून धरली. अखेर शुक्रवारी, 5 मे शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. यावर प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण पवार स्वतःच म्हणाले होते की भाकरी फिरवली पाहिजे. मात्र त्यांनी आपल्या सवयीप्रमाणे निर्णय फिरवला आहे.

    उद्धव ठाकरेंची भूमिका नेहमीच बदलते

    उद्धव ठाकरे हे बारसू इथल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी शनिवारी दौरा करत आहेत. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, नाणारच्या वेळी त्यांची वेगळी भूमिका होती, आता वेगळी भूमिका आहे. त्यांची भूमिका नेहमीच बदलत असते. मात्र स्थानिकांच्या काय भावना आहेत याबाबत सरकार त्यांच्याशी चर्चा करत आहे. बारसू प्रकरणाला विनाकारण राजकीय हवा देण्याचा प्रकार होत असल्याचा राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

    Sharad Pawar did get u turn as usual, targets radhakrishna vikhe patil

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ