Sharad Pawar Criticizes Modi Govt : अंमलबजावणी संचालनालयाच्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते. पवार म्हणाले की, विरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय. काळ जाईल तेव्हा दुरुस्त्या केल्या जातील. Sharad Pawar Criticizes Modi Govt Over ED Enquiry On Maha Vikas Aghadi Leaders
विशेष प्रतिनिधी
पुणे : अंमलबजावणी संचालनालयाच्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते. पवार म्हणाले की, विरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय. काळ जाईल तेव्हा दुरुस्त्या केल्या जातील.
शरद पवार म्हणाले की, अनिल देशमुख प्रकरणात कायदेशीर लढाई सुरू आहे, त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. यापूर्वी महाराष्ट्रात ईडीच्या केसेस होत्या का? दोन तीन वर्षांत लोकांना ईडी माहिती झाली. काळ येतो आणि काळ जातो. काळ जाईल तेव्हा दुरुस्त्या होतील. भावना गवळी यांच्या तीन-चार शिक्षण संस्था आहेत, जिथं गैरव्यवहार झाला, त्याची तक्रार गृहखात्यात करता येते. तरीसुद्धा ईडी येऊन चौकशी करते कशी? ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे. अधिकाराचा गैरवापर होत असेल तर हे चुकीचं आहे, असंही पवार म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी सहकारी बँकांविषयी बोलताना म्हटले की, सहकारी बँकेच्या व्यवहारात सरकारने किती हस्तक्षेप करावा याबाबत सूत्र ठरवले गेले पाहिजे. याबाबत राज्य सरकार पातळीवर चर्चा सुरू आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच भारतातील हिंदू-मुस्लिम यांचे पूर्वज एकच असल्याचे वक्तव्य केले आहे, यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, चांगली गोष्ट आहे, ते जर सर्व धर्म एकच समजत असतील तर चांगलंच आहे.
दुसरीकडे, राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याबद्दल ते म्हणाले की, सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. पण निवडणूक वर्ष दोन वर्षे पुढे ढकलणं योग्य वाटत नाही, सर्व पक्षीय एकत्र येऊन निर्णय घेतला जावा.
नुकतेच मुख्यमंत्र्यांनी पुढाऱ्यांना कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीवरून भाष्य केलं होतं, त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, काहीही उघडायचं असेल तर सरकारची, आरोग्य विभागाची परवानगी घेतली गेली पाहिजे. जिथे नियमांची काळजी घेतली गेली असेल तिथेच परवानगी दिली जाणार. जुन्नरमधील कार्यक्रमातील गर्दीवरही भाष्य केलं. काल मी जुन्नरला गेलो होतो. ज्यांनी कार्यक्रमांनी घेतला त्यांच्याकडून आधी सर्व माहिती घेतली होती. सरकारची परवानगी घेतली का? पोलीसांची परवानगी घेतली का? आरोग्य खात्याची परवानगी घेतली का? खुर्च्यांमध्ये अंतर ठेवले का? आदी माहिती त्यांच्याकडून घेतली. त्यांनी होकार दिल्यानंतरच मी कार्यक्रमाला गेलो. पण तिथे गेल्यावर व्यासपीठावर अतंर होतं. पण समोर लोक शेजारीशेजारी बसले होते. ते योग्य नव्हतं, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी गर्दी न करण्याबाबतचं केलेलं आवाहन योग्यच आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक जमतील अशा ठिकाणी मी सहसा जाणार नाही. गेलो तरी हॉलमधील कार्यक्रमाला जाणार. तिथे खुर्च्यांमधील अंतर असेल तरच जाणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Sharad Pawar Criticizes Modi Govt Over ED Enquiry On Maha Vikas Aghadi Leaders
महत्त्वाच्या बातम्या
- Konkan Expressway : मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या ३ तासांत होणार, ७० हजार कोटींचा प्रकल्प ६ वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा
- ममता बॅनर्जींचा ‘खेला’ सुरूच, भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत? 24 आमदार संपर्कात असल्याचा मुकुल रॉय यांचा दावा
- ड्रॅगनची खेळी : चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये तालिबान बनलंय प्यादं, अफगाणिस्तानात भारताविरुद्ध ड्रॅगनच्या कुरापती, ४.६ अब्ज डॉलर्सचा प्रकल्प
- MPSC Exam Result 2020 : राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; तीन हजार उमेदवारांची निवड पहा यादी
- बिनधास्त 50 कोटींचा दावा करा, घाबरत नाही, खंडोबा आणि बिरोबा माझे मायबाप; पडळकरांचे वडेट्टीवारांना आव्हान