• Download App
     Sharad pawar कुणी म्हणे चाणक्य, कुणी म्हणे पैलवान; पण बारामतीचे शिलेदार, झाले आता नकलाकार!!

     Sharad pawar कुणी म्हणे चाणक्य, कुणी म्हणे पैलवान; पण बारामतीचे शिलेदार, झाले आता नकलाकार!!

    नाशिक : Sharad pawar  कुणी म्हणे चाणक्य, कुणी म्हणे पैलवान; पण बारामतीचे शिलेदार झाले आता नकलाकार!!, हेच चित्र आज बारामतीत दिसले. Sharad pawar

    त्याचे झाले असे :

    महाराष्ट्रात मराठी माध्यमांनी “चाणक्य” म्हणून गौरविलेले आणि समर्थकांनी तेल लावलेला पैलवान म्हणून नावाजलेले बारामतीचे शिलेदार आज नकलाकार बनलेले अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. बारामतीच्या आखाड्यात युगेंद्र पवारांना तुतारी चिन्हावर उतरवल्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी पहिली जाहीर सभा घेतली. त्या सभेत पवारांनी भाषणात फुल बॅटिंग केली, पण त्यांनी अजित पवारांच्या कालच्या भाषणाची जी नक्कल केली, ती सर्वाधिक गाजली. त्यामुळे पवारांच्या समर्थकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा जोरदार गजर केला. Sharad pawar

    अजित पवारांनी काल अर्ज दाखल केल्यानंतर केलेल्या भाषणामध्ये ते भावनिक झाले होते. आईने सांगितले, की माझ्या दादा विरोधात अर्ज भरू नका, तरी समोरच्यांनी अर्ज भरला हे सांगताना अजितदादांचा कंठ दाटून आला होता. त्यामुळे त्यांनी पाणी पिऊन रुमालाने तोंड आणि डोळे पुसले. हे पाहून अजितदादांच्या समर्थक महिला त्या सभेतच रडल्या होत्या.

    Eknath Shinde Shiv Sena विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर!

    आज शरद पवारांनी अजितदादांच्या कालच्या रडण्याचीच नक्कल केली. त्यांनी भाषणादरम्यान अचानक चष्मा काढला आणि खिशातून रुमाल काढून डोळे पुसले. हे पाहताच पवारांच्या समर्थकांमध्ये प्रचंड हशा उसळला. त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर केला. Sharad pawar

    पण केवळ शरद पवारांनीच अजितदादांच्या रडण्याची नक्कल केली असे नाही, तर यापूर्वी लोकसभा निवडणुकीत अजितदादांनी रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल केली होती. रोहित पवार असेच एका जाहीर सभेत रडले होते आणि त्यांनी शरद पवारांना मैदान न सोडण्याची विनंती केली होती. रोहित पवारांच्या त्या रडण्याची नक्कल अजितदादांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत केली होती. त्यावेळी अजितदारांच्या समर्थकांनी असाच टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर केला होता.

    पण एकूण काय, तर बारामतीच्या मैदानातून महाराष्ट्र गाजवणारे मराठी माध्यमनिर्मित “चाणक्य” आज नकलाकार बनलेले अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. त्याही पलीकडे जाऊन काका – पुतणे दोन्ही नकलाकारच ठरले, कारण काही झाले, तरी बारामती “पवारांच्या” हातातून “इतरांच्या” जाऊन द्यायची नाही, एवढेच तर त्यांना काम उरले आहे!!

     Sharad pawar create act like ajit pawar in baramati

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!