• Download App
    Sharad pawar कोण कोण कधी जातोय, पवार बघतायेत वाट; अनुयायांना कोल्हापुरातून दाखवले सत्तेच्या वळचणीकडे बोट!!

    Sharad pawar : कोण कोण कधी जातोय, पवार बघतायेत वाट; अनुयायांना कोल्हापुरातून दाखवले सत्तेच्या वळचणीकडे बोट!!

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : महाविकास आघाडीतून महायुतीकडे कोण कोण जातोय त्याची मी वाट बघतोय अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी कोल्हापुरातून आपल्या अनुयायांना सत्तेच्या वळचणीकडे बोट दाखवले. उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटणार असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देण्याचे निमित्त शरद पवारांनी कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत साधले पण प्रत्यक्षात आपल्या अनुयायांनाच “हिंट” देऊन सत्तेच्या वळचणीला जायला सांगितले.

    उद्धव ठाकरेंची शिवसेना लवकरच फुटून त्यांचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येतील असा दावा उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता त्याची झलक आजपासून दिसणार असल्याचेही ते म्हणाले होते त्यानंतर सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांचा मोठा मेळावा घेतला. त्याला मोठी गर्दी झाली होती, असे भाष्य शरद पवारांनी केले, पण त्याच वेळी कोण कोण कधी जातोय याची मी वाट बघतोय, असे सूचक वक्तव्य देखील करून पवारांनी आपल्या अनुयायांना सत्तेच्या वळचणीची वाट दाखवली. कुठे सामान दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी गेले होते, असा टोला देखील पवारांनी हाणला.

    उद्धव ठाकरे वाटेल तो त्याग करतील, पण आपली भूमिका सोडणार नाहीत. त्यांचा महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायच्या विचार आहे. तो त्यांनी आपल्या सिल्वर ओक मधल्या भेटीत बोलून दाखविला होता. त्यावर महाविकास आघाडीत सामंजस्याने चर्चा करू, असेही पवार म्हणाले.

    Sharad pawar Conferernce from Kolhapur.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा