प्रतिनिधी
नाशिक : लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी लिहिलेल्या वादग्रस्त मजकुरावरून संभाजी ब्रिगेडने त्यांच्यावर आज नाशिकमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शाई फेकली. या प्रकारावरून विविध राजकिय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.Sharad pawar condemn ink throwghing on girish kuber by sambhaji brigade
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा प्रकार निंदनीय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत पवार यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या ट्विटमध्ये शरद पवार म्हणतात…
विशेषतः तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नावाने ज्या परिसरामध्ये साहित्य संमेलनाचा सोहळा इतक्या उत्साहाने आणि उत्तम रीतीने सुरू आहे, अशा परिसराजवळ हा प्रकार घडला. कुठेही घडणं चुकीचं आहे. पण इथे घडणं आणखी चुकीचं आहे.
देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्वीकारले आहे. आपल्या मनाविरुद्ध एखाद्या लेखकाने एखादी गोष्ट लिहिली तर त्या लेखकावर व्यक्तिगत हल्ला करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. आम्ही त्याचा पुरस्कार कधीही करणार नाही. ही घटना नींदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही.
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या पुस्तकासंदर्भाचा विवाद गेल्या पाच-सहा महिन्यांपासून चालू आहे. हे पुस्तक मी स्वतः वाचलेलं आहे. लोकशाहीत अधिकार असल्याने आपली मते व्यक्त करण्याची भूमिका घेऊ शकतात. त्या मतांचा विरोध करणारे दुसरेही घटक असू शकतात.
Sharad pawar condemn ink throwghing on girish kuber by sambhaji brigade
महत्त्वाच्या बातम्या
- आम आदमी पार्टी सोडण्यासाठी मोदी कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची ऑफर; खासदार भगवंत मान यांचा खळबळजनक दावा!!
- पंचगंगा नदीमध्ये फेस आढळून आला
- शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी सोडला ‘संसद टीव्ही’ शो ‘मेरी कहानी’; राज्यसभेतील निलंबनानंतर तडकाफडकी राजीनामा
- शिक्षकांच्या मोर्चावर लाठी चार्ज : उत्तर प्रदेशमधील ६९००० सहाय्यक शिक्षकांच्या शांततापूर्ण मार्गाने होणाऱ्या कॅडल मोर्चावर पोलिसांचा लाठी चार्ज