विशेष प्रतिनिधी
पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राज्यातील वातावरण दूषित करत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी जेम्स लेन प्रकरणापासून प्रत्येक वेळी पवारांनी जातिद्वेषाचे राजकारण केल्याचा आरोप केला. पवारांचे राजकारण हे जातींमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे. निवडणुका येतील आणि जातील त्यांच्या नादी लागू नका, असे राज ठाकरे म्हणाले होते. मात्र त्यावर शरद पवारांनी आपण कधीच जातिवादी राजकारण करत नसल्याचा दावा केला. Sharad Pawar claims that he is not doing casteist politics
मराठा आरक्षण आंदोलनाचे अनेक नेते फक्त शिंदे – फडणवीस सरकार मधल्या नेत्यांना आतापर्यंत टार्गेट करत होते. परंतु, आता त्यांनी थेट पवारांना देखील जाब विचारायला सुरुवात केल्यानंतर पवारांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वपक्षीय बैठकीवर ढकलला. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यात मनोज जरांगे आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्याची सूचना केली. या पत्रकार परिषदेत त्यांना राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपण जातिवादी राजकारण करत नसल्याचा दावा केला.
राज ठाकरे यांनी दोन तीनदा माझे नाव का घेतले, ते मला कळले नाही. मी या रस्त्याने जात नाही. मला महाराष्ट्र ओळखतो. माझी पार्श्वभूमी अशी नाही. आग्रह केला नाही. करणार नाही. मणिपूरबाबतचा प्रश्न वेगळा होता. हातभर लावण्याचा काम करतोय की आता जे बोललो ते सोडवण्याचे काम करतोय. त्यांनी कारण नसताना माझे नाव घेतले. मीही मराठवाड्यात फिरतो. मलाही लोकांनी अडवलं. मला निवेदन दिलं. हे पवारच करतात का??, असा सवाल शरद पवारांनी केला.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच मनोज जरांगेंच्या अडून राजकारण करत आहेत. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. माझ्या नादी लागू नका. माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही. उद्या माझे मोहळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत. माझ्याकडे विस्थापीत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले होते.
शरद पवारांसारखे 83 वर्षांचे नेते महाराष्ट्रात “मणिपूर” होईल, असे वक्तव्य करत आहे. शरद पवारांसारखा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहे. त्यांनी पुढे येऊन हे सगळे थांबवले पाहिजे तर तेच म्हणतात, महाराष्ट्राचा “मणिपूर” होईल. शरद पवारांनी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे, तर तेच जातिवाद भडकावयला हातभार लावत आहेत. शरद पवारांचे राजकारण हे जातींमध्ये द्वेष पसरवणे हेच आहे. निवडणुका येतील जातील यांच्या नादी लागू नका, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला होता. त्यावर शरद पवारांनी आपण जातिवादी राजकारण करत नसल्याचा दावा केला.
Sharad Pawar claims that he is not doing casteist politics
महत्वाच्या बातम्या
- Paris olympics : भारताचा खेळाडूंवर 470 कोटी खर्च, माध्यमांनी काढला खुसपटी अर्थ; पण विकसित देश खर्च किती करतात??
- Muhammad Yunus : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावर सोडले मौन!
- Hindenburg : हिंडेनबर्गच्या नव्या अहवालावरून भाजपचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
- UPI payments : UPI पेमेंटमध्ये 2 मोठे बदल आहेत, कर भरण्यापासून ते व्यवहारापर्यंत सर्व काही अगदी सोपे होणार