• Download App
    बारामतीत मतदान झाले 7 तारखेला, बीडमध्ये झाले 13 तारखेला; पवारांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आज 20 तारखेला!!|Sharad pawar claims booth capture and bogus voting in baramati, beed and pune district

    बारामतीत मतदान झाले 7 तारखेला, बीडमध्ये झाले 13 तारखेला; पवारांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आज 20 तारखेला!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाले 7 मे रोजी, बीडमध्ये मतदान झाले 13 मे रोजी, पण शरद पवारांनी या दोन्ही मतदारसंघांमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आज 20 मे रोजी!! पण मूळात पवारांनी बालेकिल्ला बारामती लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला हेच विशेष!!Sharad pawar claims booth capture and bogus voting in baramati, beed and pune district



    एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी बारामती आणि बीड लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. या संदर्भात संबंधित पक्षांविरुद्ध कारवाई करावी. बारामती मतदारसंघात कधी पैसे वाटले असे मी ऐकले किंवा पाहिले नव्हते, पण यावेळी मात्र पैसे वाटले गेले. रात्री 2.00 वाजेपर्यंत बँका उघड्या होत्या. हे आत्तापर्यंत बारामती कधीच झाले नव्हते. त्या ऊपर बारामती बोगस मतदान केले गेले, अशी आमची माहिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी शरद पवारांनी केली.

    महाराष्ट्रात बारामती, बीड आणि पुणे जिल्हा वगळता इतरत्र शांततेत मतदान झाले, पण बीडमध्ये बूथ कॅप्चरिंग झाले. पुणे जिल्ह्यातही बूथ कॅप्चरिंगचे प्रकार घडले. या सगळ्या गैरप्रकारांमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शरद पवारांनी केली.

    शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी दहा जागांवर निवडणूक लढवत आहे त्यामध्ये बारामती, बीड आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर या जागांचा समावेश आहे. पवारांनी या तीन जागांवर बोगस मतदान झाल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. एरवी पवारांनी आपल्या बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघांमध्ये बोगस मतदान झाल्याचे किंवा बूथ कॅप्चर झाल्याचे आरोप कधीच केले नव्हते. 2024 च्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी ते आरोप केले. या आरोपांचा नेमका अर्थ काय काढायचा??, शिवाय ज्या मतदारसंघांबद्दल पवारांनी आरोप केले, त्या बालेकिल्ल्यांमध्ये पवारांच्या पक्षाचे काय होणार??, असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत.

    Sharad pawar claims booth capture and bogus voting in baramati, beed and pune district

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस