विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राजवाडे संशोधन संस्थेच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात जे राजकीय उद्गार काढले, ते महाराष्ट्रात सध्या चर्चेचे विषय ठरले आहेत. उद्धव ठाकरे, मी आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येऊन काही ठरवले, तर महाराष्ट्रात बदल घडेल, असे वक्तव्य शरद पवारांनी या कार्यक्रमात केले. त्यामुळे महाराष्ट्रात तथाकथित नव्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे. Sharad pawar claimed if he, thackeray and thorat come together, there will be change in maharashtra
पण पवारांच्या या वक्तव्यामुळे काही सवालही तयार झाले आहेत. ते म्हणजे पवार म्हणतात त्याप्रमाणे इथून पुढे उद्धव ठाकरे, ते स्वतः आणि बाळासाहेब थोरात एकत्र आले तर या वक्तव्यातच राजकीय विसंगती आहे. कारण 2019 मध्येच ते एकत्र आले होते आणि त्यांनी सरकार स्थापन केले होते. पण ते सरकार फक्त अडीच वर्ष चालू शकले आणि नंतर हे तिन्ही नेते एकत्र असूनही सरकार जायचे ते गेलेच.
मग इथून पुढच्या काळात पवार, ठाकरे आणि थोरात एकत्र आले तर ते काय ठरवतील आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रात काय होतील?? असाही सवाल आहे.
त्यातही निदान उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची भूमिका तरी राजकीय दृष्ट्या प्रामाणिक भाजप विरोधाची राहिली आहे. पण खुद्द पवारांची भूमिका तेवढी राजकीय दृष्ट्या प्रामाणिक मानण्याची परिस्थिती त्यांच्याच राजकीय वर्तणुकीतून दिसून येते का??, हा मुख्य प्रश्न आहे.
ठाकरे – थोरात यांची भूमिका प्रामाणिक
कारण भाजपबरोबरच्या सत्तेत ठाकरे किंवा बाळासाहेब थोरात हे दोघेही नेते गेले नाहीत, तर पवारांचे पुतणे अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले आहेत. मग एकीकडे पुतण्याला भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठवून द्यायचे आणि दुसरीकडे आपण, ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकत्र आले तर महाराष्ट्रात काही घडू शकेल, असे वक्तव्य करायचे असे डबल गेमी राजकारण पवार करत आहेत का?? असाही सवाल तयार झाला आहे.
पवारांचे वक्तव्य 1 ऑगस्टपर्यंत टिकेल का?
त्याचबरोबर पुढचा कळीचा मुद्दा म्हणजे, ठाकरे, पवार आणि थोरातांचे एकत्र येण्याचे आजचे 30 जुलै 2023 चे सायंकाळचे वक्तव्य हे 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळपर्यंत जसेच्या तसे टिकून राहील का?? आणि 1 ऑगस्ट 2023 च्या सकाळ नंतर पवारांच्या मुखातून कोणते वक्तव्य बाहेर पडेल?? आणि ते वक्तव्य 30 ऑगस्ट 30 जुलै च्या वक्तव्याशी ताडून पाहिल्यावर त्यात सुसंगती टिकेल का??, हा ही सवाल तयार झाला आहे.
Sharad pawar claimed if he, thackeray and thorat come together, there will be change in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- I.N.D.I.A आघाडीचा देशभरात काँग्रेसला “तब्बल” 12 जागांचा फायदा; NDA आघाडीत भाजपचे 13 जागांचे नुकसान!!
- अमेरिका तैवानला 28 हजार कोटींचे लष्करी पॅकेज देणार; हवाई संरक्षण आणि पाळत ठेवणारी यंत्रणा; चीनचा इशारा
- दिल्लीत मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार, 12 जखमी; जमावाने कारच्या काचा फोडल्या, बसवर दगडफेक
- अहमदनगर हादरले, ट्यूशनमध्ये शाळकरी मुलींच्या धर्मांतराचा प्रयत्न, शिक्षिकेसह 5 जणांना अटक