नाशिक : अंतरवलीतला खेळ फसला, आता मारकडवाडीत घुसू; विधानसभा तर गेली, निदान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तरी डिपॉझिट वाचवू!!, अशी आयडियेची कल्पना लढवून अंतरवाली सराटीचे मास्टर माईंड आता मारकडवाडीत घुसलेत. तिथल्या ठिणगीचा वणवा पेटवायची भाषा सुरू आहे. मारकडवाडीचे सगळे गावकरी सरकारने ग्रामस्थांवर अन्याय केलाचा मास्टर माईंड समोर करत आहेत. बाकी त्यांच्या तोंडी भाषा फुले शाहू आंबेडकर आणि संविधानाचीच आहे, पण कृती मात्र ठिणगीचा वणवा पेटवायची आहे!!
अंतरवली सराटी मध्ये असाच खेळ गेली दीड – दोन वर्षे रंगला होता. त्या गावातून मनोज जरांगे नावाच्या तरुणाला उकसवून मराठा आरक्षणाचा मोठा “खेळ” मांडला होता. त्यातून गावागावात जातीय तेढ निर्माण झाली, तरी फुले शाहू आंबेडकर नावाचा घोष मात्र जोरात सुरू होता. हे सगळे महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी म्हणून मास्टर माईंडने घडवून आणले होते.
पण मास्टर माईंडचा हा सगळाच “खेळ” आणि “डाव” भाजपच्या कुठल्याही चाणक्यांपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने वेळीच ओळखला आणि तो “खेळ” आणि “डाव” पूर्ण उधळून लावला. ज्या साठी केला होता अट्टाहास, त्यालाच पुरता अडकवला पराभवाच्या पाशात!!, अशी मास्टर माईंडच्या पक्षाची अवस्था भाजप किंवा महायुतीने केली नाही, तर ती महाराष्ट्राच्या जनतेने केली. चाणक्य + वस्ताद म्हणवून मिरवणाऱ्या नेत्याला 10 आमदारांचा नेता म्हणून शिल्लक ठेवले.
पण यातून आत्मपरीक्षण करून काही वेगळे डावपेच आखून पुढची वाटचाल करेल, तर तो मास्टर माईंड कसला?? मास्टर माईंडचा अंतरवली सराटीतला डाव फसला आणि मास्टर माईंड मारकडवाडीत घुसला. विधानसभा गेली असली, तरी निदान आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या उमेदवारांचे डिपॉझिट तरी वाचवू म्हणून मारकडवाडीतून आंदोलनाची ठिणगी पेटवून त्यातून देशभर वणवा पेटवायची भाषा मारकडवाडीतून सुरू झाली.
मास्टर माईंडचा उत्तम जानकर नावाचा तिथला आमदारही फार हुशार. त्या आमदाराने सभेत राजीनामा देण्याची मोठी गर्जना तर केली, पण तो निवडणूक आयोगाकडून फक्त माढा मतदारसंघांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे आश्वासन घेऊन मगच राजीनामा देण्याचा पवित्रा मास्टर माईंडच्या आमदाराने घेतला. जणू काही फक्त एकाच मतदारसंघात निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार आणि मग पुन्हा तो आमदार निवडून येणार असा आव मास्टर माईंडच्याच आमदाराने आणला!!
यातून एकीकडे आमदारकी वाचवायची आणि दुसरीकडे गर्जना करायची हाच मास्टर माईंडचा “डाव” यातून उघड झाला.
पण हे सगळे करायचे कशासाठी??, तर निदान पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीमध्ये आपल्या उमेदवारांचे डिपॉझिट तरी वाचावे म्हणून!! त्यापलीकडे मास्टर माईंडच्या मारकडवाडीतल्या खेळाला नाही कुठला अर्थ, आहे तो फक्त डिपॉझिट वाचवायचा स्वार्थ!!
Sharad pawar blamed EVMs for elections losses
महत्वाच्या बातम्या
- CM Devendra Fadnavis : याला म्हणतात आकड्यांची गुगली; गणित कच्चं असलेल्या विद्यार्थ्याने मास्तरचीच विकेट काढली!!
- Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरचे मंत्री म्हणाले, रोहिंग्यांना वीज अन् पाणी पुरवणे हे सरकारचे कर्तव्य
- Subhash Ghai : चित्रपट निर्माते सुभाष घई यांची प्रकृती चिंताजनक
- CM Fadnavis’ : शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर, लोकसभेत मिळालेली मते दाखवली