• Download App
    समझनेवालों को इशारा काफी; शरद पवारांनीच घातली होती भाजपला टोपी!!|Sharad Pawar betrayed BJP during devendra Fadanavis - ajit Pawar government formation

    समझनेवालों को इशारा काफी; शरद पवारांनीच घातली होती भाजपला टोपी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या नव्हे, तर सकाळी आठ वाजताच्या “शपथविधीचे रहस्य” अखेर चिंचवड मुक्कामी उलगडले आहे. कारण दस्तुरखुद्द शरद पवारांनी “समझनेवाले को इशारा काफी है”, असे सांगत आपणच भाजपला टोपी घातल्याची कबुली देऊन टाकली आहे. अर्थात ही कबुली त्यांनी आपल्या नेहमीच्याच राजकीय शैलीनुसार प्रत्यक्ष रूपाने न देता परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष दिली आहे.Sharad Pawar betrayed BJP during devendra Fadanavis – ajit Pawar government formation

    देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी आठ वाजताच्या शपथविधी बद्दल टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत जो काही गौप्यस्फोट केला होता, त्याचा प्रतिवाद त्यावेळी शरद पवारांनी जरूर केला होता. शरद पवार साहेबांशीच भाजप – राष्ट्रवादीचे सरकार स्थापनेची चर्चा झाली होती. कारण उद्धव ठाकरे हे त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबर डील करत असल्याचे आमच्या आले होते. त्यामुळे आम्हाला गप्प बसता येणे शक्य नव्हते.



    म्हणून राष्ट्रवादीतल्या बाकी कोणत्याही नव्हे, तर थेट शरद पवारांशीच चर्चा करून भाजप – राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन केले होते. कारण राष्ट्रवादीची भूमिका स्थिर सरकारची होती, अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी गौप्यस्फोट केला होता. परंतु फडणवीस हे सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणी आहेत. ते असे खोटे बोलतील असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून त्यावेळी शरद पवारांनी फडणवीसांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला होता. तरीदेखील फडणवीस आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले होते. इतकेच नाही, तर आपण फक्त अर्धेच बोललो आहोत अजून अर्धे बोलायचे आहे. अजितदादा बोलल्यावर मी उरलेले अर्धे सांगेन, असा “समजदारांना काफी इशारा”ही त्यांनी दिला होता.

    आज अखेर चिंचवड मधल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सकाळच्या शपथविधी विषयी ही आपलीच खेळी असल्याची कबुली देऊन टाकली आहे. जर राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का असा सवाल करून समझनेवाले को इशारा काफी है, असे वक्तव्य पवारांनी केले आणि तिथेच ही आपल्या कबुली आपल्या खेळीची कबुली पवारांनी देऊन टाकली. एक प्रकारे आपणच भाजपला टोपी घातल्याची ही पवारांची कबुली आहे. आता या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस हे अजितदादा बोलायची वाट बघणार की उरलेले अर्धे सरळ सरळ पुढे येऊन सांगून टाकणार??, हे पाहणे आणि ऐकणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Sharad Pawar betrayed BJP during devendra Fadanavis – ajit Pawar government formation

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ