• Download App
    Sharad Pawar त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर "ठाकरे कुटुंबीय"; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राज ठाकरेंनी विचारलेल्या राज की उद्धव??, या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिले होते “ठाकरे कुटुंबीय”, पण आता जेव्हा दोन्ही भाऊ एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी मात्र पवारांनी कानावर हात ठेवले.

    राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर सगळ्या महाराष्ट्राभर चर्चा सुरू असताना त्यावर शरद पवार अद्याप बोलले नव्हते, ते आज बोलले. मात्र ठाकरे बंधूंनी एकत्र येणे हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे‌. मी त्यांच्याशी बोललेलो नाही. त्यामुळे मी त्यावर काय भाष्य करणार??, असे म्हणून शरद पवारांनी आज कानावर हात ठेवला.

    मात्र यात शरद पवारांची काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी जाहीर मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी त्यांना तुम्ही कुणाची बाजू घेणार, राज ठाकरे की उद्धव ठाकरे यांची??, असा सवाल केला होता. त्यावर पवारांनी अतिशय चलाखीने “ठाकरे कुटुंबीय” असे उत्तर उत्तर देऊन दोघांनाही कात्रजचा घाट दाखविला होता.

    पण आज ज्यावेळी दोन्ही ठाकरे बंधू गांभीर्याने एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली, त्यावेळी मात्र पवारांनी तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न असल्याचे सांगून कानावर हात ठेवत ते मोकळे झाले.

    Sharad Pawar avoids question of Thackeray brothers unity

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसते पैसे चारल्याचे आरोप करून उपयोग काय??; निवडणूक आयोगात गंभीर तक्रार का नाही केली दाखल??

    Fadnavis : फडणवीस म्हणाले- पाकिस्तान भारताला हरवू शकत नाही म्हणून पहलगाम हल्ला व दिल्ली स्फोट; 26/11नंतर ऑपरेशन सिंदूर केले असते तर धाडस झाले नसते

    Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीची आत्महत्या, 10 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न