विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ शरद पवारांनी देखील अजित पवार आपलेच राष्ट्रवादीचे नेते असल्याचा खुलासा केल्यानंतर राष्ट्रवादीत नुरा नाही आणि कुस्ती नाही हे उघड झाले. पण या नुरा कुस्तीचा खरा भांडाफोड ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी केला.Sharad pawar avoiding legal battle in NCP, ujjwal nikam tells the truth
शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायदेशीर लढाई करायची नाही. राष्ट्रवादीचे कोणतेही आमदार अपात्र ठरू द्यायचे नाहीत म्हणून त्यांनी अजित पवारांना राष्ट्रवादीचे नेते मानले असावे, असे राजकीय इंगित उज्ज्वल निकम यांनी उघड करून सांगितले.
आता यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी त्याचा कायदेशीर बाबींशी काही संबंध नाही, असे उज्वल निकम म्हणाले. त्याच वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जे काही कळवायचे ते कळविले आहे, असे म्हटले आहे. पण विधानसभा अध्यक्षांना त्यांनी नेमके काय कळविले आहे??, हे मात्र सांगितले नाही. पण त्यामुळे एकूणच पवारांना राष्ट्रवादीत कोणतीही कायदेशीर लढाई करायची नाही हेच आता तरी यातून दिसते असे उज्वल निकम यांनी स्पष्ट केले.
देशाच्या विकासासाठी अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे आले आहेत, मग शरद पवार हे राहुल गांधींच्या मागे जाऊ शकतात का??, असा असा सवाल करून राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारही लवकरच अजित पवारांच्या पाठोपाठ भाजपबरोबर येतील, असा दावा केला आहे.
तर अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतलेले अनिल पाटील यांनी अजित पवार आता लोकनेते झाल्यामुळे शरद पवारांनी त्यांना मान्यता दिली आहे, असे वक्तव्य केले आहे.
Sharad pawar avoiding legal battle in NCP, ujjwal nikam tells the truth
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा, ‘LAC’वरील तणाव कमी करण्यावर एकमत!
- रॉकेट्री : नंबी इफेक्ट ते द काश्मीर फाइल्स; राष्ट्रीय बाण्याच्या सिनेमांवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची मोहोर!!
- चांदणी चौक : रस्ते चकचकीत, वाहतूक सुरळीत!!
- नरसिंह राव काँग्रेसचे नव्हे, तर भाजपचे पहिले पंतप्रधान; सोनियांच्या उपस्थितीत मणिशंकर अय्यरांचे आरोप बेलगाम!!