विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपण मांसाहार केला आहे त्यामुळे मंदिरात येत नाही असे सांगून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दरवाज्यातून परत गेलेले शरद पवार निवडणूक वर्षात आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जावई आणि नातीसह दाखल झाले. Sharad pawar at lalbaugh raja darshan
आपण पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला जातो पण गाजावाजा करत नाही, असे पवार काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. त्या आधी काही महिने पवार दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनाला येणार याचा बराच गाजावाजा झाला होता. पवारांनी त्यावेळी भिडेवाडा परिसराची पाहणी केली आणि नंतर ते दगडूशेठ हलवाई मंदिराच्या परिसरात गेले. परंतु ते दरवाजातूनच मागे फिरले. आपण मांसाहार केल्यामुळे मंदिरात गेलो नाही, असे नंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. पण सार्वजनिक गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे सुरू असताना पवार आपले जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले.
लालबागमध्ये देश-विदेशातून भाविकांनी गर्दी केली आहे. एवढंच काय तर, अनेक राजकीय नेतेमंडळींनीही लालबागमधील गणपती मंडळांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. लालबागमधील प्रसिद्ध मंडळांपैकी एक असलेलं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातही गणरायाच्या दर्शनासाठी अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
थोरले पवार दुसऱ्यांदा लालबाग राजाच्या चरणी लीन झाले आहेत. यापूर्वी ज्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर अनेक वर्षांनंतर आज शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला दाखल झाले आहेत. कोरोना काळात रक्तदान शिबिराचं आयोजन लालबागच्या राजाच्या मंडळानं केलं होतं, त्यावेळी देखील शरद पवार आले होते. मात्र, त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मंडळाने गणपतीची स्थापना केली नव्हती. फक्त रक्तदान शिबिराचं आयोजन केले होते. त्याला पवारांनी हजेरी लावली होती. पण यंदाच्या निवडणूक वर्षात मात्र त्यांनी जावई आणि नातीसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यापूर्वी लालबागच्या राजाचं दर्शन घेतले.. तसेच, देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनीदेखील सहकुटुंब लालबाग राजाचं दर्शन घेतले.
पण शरद पवार फक्त लालबागचा राजाचे दर्शन घेऊन थांबले नाहीत. ते जावई आणि नातीसह चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला देखील पोहोचले.
Sharad pawar at lalbaugh raja darshan
महत्वाच्या बातम्या
- Congress : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अन् ‘आप’चं अखेर जुळलं!
- Manoj jarange + Sambhji Raje : जरांगे + संभाजीराजे : चर्चा तिसऱ्या आघाडीची; पण निवडणुकीनंतरच्या समीकरणात सत्ता भरती कुणाची??
- Sharad Pawar : गुरुने दिला छुपा हा वसा; जरांगेंच्या तोंडी फक्त पाडण्याची भाषा!!
- Dalpati Vijay : दलपती विजय तमिळनाडूत 2026च्या निवडणुकीच्या लढाईत उतरण्यास तयार