प्रतिनिधी
सांगली : महाराष्ट्रात पूर्वी एकच खंजीर खुपसणारे राजकीय नेते होते. आता मात्र दोन झालेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला रयत क्रांती पक्षाचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दुजोरा दिला आहे. चंद्रकांत दादा पाटील खरंच बोललेत. ते काही चुकीचे बोलले नाहीत, असे ते म्हणाले. Sharad Pawar and Uddhav Thackeray, The two back stabbers in Maharashtra politics, allaged chandrakant patil and sadabhau khot
शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी आहेत. हे महाराष्ट्रातल्याच नाही तर सगळ्या देशातल्या जनतेला माहिती आहे. शिवसेनेला भाजपपासून फोडून त्यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आणली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जनतेने बहुमत दिले नव्हते. भाजप आणि शिवसेना महायुतीला बहुमत दिले होते. परंतु, महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात अभद्र आघाडी करून सत्ता आणली, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केले केला.
शेतीमाल देशातल्या शेतकऱ्याला कुठेही विकता आला पाहिजे, असे शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे. परंतु, जेव्हा मोदी सरकारने कृषी कायदे आणले तेव्हा विरोधकांमध्ये सामील होऊन शरद पवार यांनी कृषी कायद्यांना विरोध केला आहे. पवारांची राजकारणातली विश्वासार्हता शून्य आहे. त्यामुळे देशाच्या पातळीवर त्यांच्या कुठल्याही घोषणेला कोणताही राष्ट्रीय नेता महत्त्व देत नाही. त्यांना महाराष्ट्रातलाच प्रादेशिक नेता मानतात, अशी घणाघाती टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नेमकी हीच टीका केली होती. यातल्या फक्त उद्धव ठाकरे यांच्यावरच या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले होते. बंद दरवाजाआड काय काय घडले हे आम्ही सांगणार नाही. पण खंजीर खुपसण्याचे आरोप आमच्यावर लागत नाहीत, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले होते.
Sharad Pawar and Uddhav Thackeray, The two back stabbers in Maharashtra politics, allaged chandrakant patil and sadabhau khot
महत्त्वाच्या बातम्या
- GST Collection In August : जीएसटी संकलनात ३०% ची मोठी वाढ, २ दिवसांत अर्थव्यवस्थेसाठी ४ आनंदाच्या बातम्या
- तालिबानकडून सुशिक्षित मुलींचा घरोघरी शोध; अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप, बलात्कार आणि हत्येची धमकी
- मोदींच्या GDP तील वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol ची दरवाढ; २३ लाख कोटी रूपये गेले कुठे? राहुल गांधींची सरकारवर टीका