प्रभाकर साईल या पंचाने केलेल्या लाचखोरीच्या आरोपावरुन समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली आहे.Sharad Pawar and Uddhav Thackeray should be ashamed; Strong attack by Kirit Somaiya
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिकांनी आरोपांवर आरोप सुरूच आहेत . याचदरम्यान आता प्रभाकर साईल या पंचाने केलेल्या लाचखोरीच्या आरोपावरुन समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे . सोमय्या म्हणाले की , “समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे.त्यांना लाज वाटली पाहिजे.”
पुढे सोमय्या म्हणाले की , गेली 12 दिवस झाले हाच वाद चाललाय समीर वानखेडे दलित आहे की मुस्लिम आहे.मुळात हे प्रकरण अजितपावरांना वाचवण्यासाठी सुरू करण्यात आले.कारण अजित पवारांवर 11 दिवस धाडी सुरु होत्या.
शरद पवार यांनी स्पष्ट केलं की अजित पवारांकडे चिल्लर सापडली आणि बिल्डरकडे 180 कोटी सापडले, पण त्याच बिल्डरने अजित पवारांना 100 कोटी रुपये दिले आहेत. अजित पवारांचे हे घोटाळे सिद्ध झाले आहेत.अजित पवार सिंचन घोटाळ्यात आरोपी आहेत. चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आहे. त्यावरील कारवाई या सरकारने थांबवली आहे, असं सोमय्यांनी म्हटलंय.
सोमय्या म्हणाले की, नारायण राणेंचा बंगला अनधिकृत असल्याचं तुम्ही सांगता मग तुम्ही कारवाई का करत नाही. संजय राऊत यांचं पत्र मी रद्दीत टाकलं आहे.मी त्या पत्राला काडीची किंमत देत नाही. 31 डिसेंबरपर्यंत अलीबाबा आणि चाळीस चोरांचे घोटाळे मी बाहेर काढणार. यात उद्धव ठाकरे यांनी कितीही ट्रिक काढल्या तरी घोटाळेबाज सुटणार नाहीत, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिला आहे.
Sharad Pawar and Uddhav Thackeray should be ashamed; Strong attack by Kirit Somaiya
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना कन्नडसक्ती नको , कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत
- कोरोना लसीकरणात मागास जिल्ह्यांमध्ये ‘हर घर दस्तक’ केंद्र सुरू होणार
- शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडून केली ७५ कोटींची मागणी , मानसिक छळाचा केला आरोप
- पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत; सोनारपूर नगरपालिका क्षेत्रात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊन