• Download App
    शरद पवार आयत्या वेळेला कच खाणारे नेते; प्रफुल्ल पटेल यांचे थेट शरसंधान|Sharad pawar always been a hesitant leader, says praful patel

    शरद पवार आयत्या वेळेला कच खाणारे नेते; प्रफुल्ल पटेल यांचे थेट शरसंधान

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : शरद पवारांकडे सगळे चांगले नेतृत्व गुण आहेत, पण ते आयत्या वेळेला कच खाणारे नेते आहेत, अशा शब्दांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पवारांवर शरसंधान साधले. त्याचवेळी शरद पवारांशी अजूनही व्यक्तिगत पातळीवर चांगले संबंध असल्याचा निर्वाळा प्रफुल्ल पटेल यांनी दिला.Sharad pawar always been a hesitant leader, says praful patel

    एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचे अनेक किस्से जाहीरपणे सांगितले. अजित पवारांनी शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी देखील पवार 50 % राजी झाले होते, पण आयत्या वेळेला त्यांनी माघार घेतली. त्यामुळे अजित पवारांना कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी पुढे जाणे भाग पडले, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.



    2 जून 2023 रोजी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात शपथ घेतली. त्यानंतर 15 आणि 16 जुलै 2023 रोजी सगळ्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी देखील अजित पवारांनी त्यांना आपल्या निर्णयाबरोबर येण्याची विनंती केली होती. त्यावेळी पवार राजी झाले होते. नंतर देखील पुण्यातल्या एका उद्योगपतीच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची चर्चा झाली होती त्यावेळी पवार 50 % राजी झाले होते, पण त्यांनी आयत्या वेळेला कच खाल्ली, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

    कच खाल्ल्यामुळे पवार पंतप्रधान झाले नाहीत

    प्रफुल्ल पटेल यांनी पवारांच्या कच खाण्याची जुनी आठवण देखील यावेळी शेअर केली. 1996 मध्ये पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय त्यावेळचे काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी घेतला, पण तो कुठल्याच काँग्रेस खासदाराला आवडला नव्हता. त्यावेळी शरद पवार काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते होते. त्यावेळी एच. डी. देवेगौडा यांनी आपल्याला सांगितले होते की, शरद पवारांना काँग्रेसचे नेतृत्व करायला सांगा. मी राजीनामा देतो त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकतील. पण शरद पवारांनी आयत्या वेळी तेव्हा देखील कच खाल्ली. त्यामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत, अन्यथा आमचे नेते शरद पवार पंतप्रधान झाले, याचा आम्हाला कितीतरी आनंद झाला असता, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

    Sharad pawar always been a hesitant leader, says praful patel

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस