• Download App
    मोदींनी विश्वासात घेतले नाही म्हणून नव्या संसद भवन उद्घाटन कार्यक्रमावर शरद पवारांचाही बहिष्कार|Sharad Pawar also boycotted the inauguration program of the new Parliament House as he did not believe Modi

    मोदींनी विश्वासात घेतले नाही म्हणून नव्या संसद भवन उद्घाटन कार्यक्रमावर शरद पवारांचाही बहिष्कार

    प्रतिनिधी

    मुंबई : नवीन संसद भवन बांधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विश्वासात घेतले नाही म्हणून विरोधी पक्ष नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहेत. या बहिष्काराला शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे.Sharad Pawar also boycotted the inauguration program of the new Parliament House as he did not believe Modi

    नव्या संसद भवनाचे उद्घाटन उद्या 28 मे 2023 रोजी सावरकर जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेस सह 21 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. या बहिष्काराला आता शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे.



    या संदर्भात शरद पवार म्हणाले, की मी राज्यसभेचा सभासद आहे. पण संसदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन झाले ते आम्ही वर्तमानपत्रात वाचले. त्यावेळी देखील कोणाला निमंत्रण नव्हते. आता संसद भवनाचे उद्घाटन होत आहे या सर्व प्रक्रियेत सरकारने खासदारांना विश्वासात घेतले नाही. सर्वसाधारणपणे अशा मोठ्या भवनांचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होत असते. पण तसही केले जात नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. त्याला माझा पाठिंबा आहे.

    Sharad Pawar also boycotted the inauguration program of the new Parliament House as he did not believe Modi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!