• Download App
    ओबीसी आरक्षणाचा अधिकार राज्यांना देऊन उपयोग नाही, जेवायला दिले पण हात बांधून ठेवले अशी स्थिती, शरद पवार यांचा आरोप|Sharad Pawar alleges that giving OBC reservation to states is useless, giving food but keeping hands tied

    ओबीसी आरक्षणाचा अधिकार राज्यांना देऊन उपयोग नाही, जेवायला दिले पण हात बांधून ठेवले अशी स्थिती, शरद पवार यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाचा अधिकार राज्यांना दिला असला तरी त्याचा उपयोग बाही. कारण देशातील 90 टक्के राज्यात 50 टक्केपेक्षा आरक्षण आहे. जेवायला निमंत्रण दिले पण हात बांधून ठेवले अशी स्थिती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.Sharad Pawar alleges that giving OBC reservation to states is useless, giving food but keeping hands tied

    मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी राज्याचे अधिकार काढून घेतले होते.आता पुन्हा दिले आहेत. पण त्याचा उपयोग नाही.1992 साली इंद्रा सहानी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे की 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही.



    त्यामध्ये अजून एक दुरुस्ती करून 10 टक्के वाढ केली. देशात अनेक राज्यात 50 टक्केच्या वर आरक्षण आहे. याचा परिणाम असा झालाय की देशात 50 टक्केच्या वर जात येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने फसवणूक केली आहे. संसदेत हा विषय आला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका मांडली. 50 टक्केची अट काढून टाका आणि केंद्राकडून एमपेरिकल डेटा ची मागणी केली. जाती निहाय जनगणना करणे आवश्यक आहे, असे सांगितले.

    राज्यातील तरुणांना नैराश्य येऊ नये यांसाठी तरुणांच्या सभा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घेण्यात येणार असल्याचे सांगून राज्यांना आणखी अधिकार देण्याची गरज आहे.याबाबत जनमत तयार करावे लागेल
    जातीनिहाय जनगणना झाली तर लहान घटकांना संदेश जाईल की त्यांची संख्या किती आहे. तो जाऊ नये यासाठी इम्पेरिकल डेटा दिला जात नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला.

    Sharad Pawar alleges that giving OBC reservation to states is useless, giving food but keeping hands tied

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना